तापमान 44.2 अंशांवर; उष्माघात उपाययोजनांबाबत निर्देश:जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात 137 खाटा करण्यात आल्या राखीव‎

0
transfar_transfar_240_177626226169df9c754dfed_ushmaghat.jpg



शहरात बुधवारी ४४.२ अंश तापमान नोंदवल्या गेले. मंगळवारी तापमानाचा पारा ४४ अंशांवर होता. भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट आली आहे. अमरावतीचे तापमान ४४ अंश नोंदवले गेले आहे. तिसऱ्या क्रमांका

.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा घेत सर्व रूग्णालये, यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती फुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने आदी उपस्थित होते. प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात १३७ खाटा राखीव ठेवल्या आहेत. ओआरएस व औषधसाठा पुरेसा ठेवा, उष्माघातापासून दक्षतेबाबत नागरिकांत जनजागृती करा, ग्रामीण भागात दवंडी द्या, शहरात होर्डिंग्ज, ध्वनीचित्रफीतीद्वारे जनजागृती करा, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

दरम्यान कामगारांसाठी आस्थापनांनी पेयजल, कुलर आदी सुविधा कराव्या. उन्हात अधिक वेळ श्रमाची कामे टाळावी, कारखान्यांच्या बॉयलर रुममध्ये काम टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

उष्माघात टाळण्यासाठी हे करा डोक्यावर टोपी, रुमाल बांधा किंवा छत्रीचा वापर करा, हलक्या रंगाचे सुती कपडे घाला, भरपूर पाणी प्या, ताक, लिंबूपाणी, नारळ पाण्याचे सेवन करा, दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात काम करणे टाळा, उन्हात अनवाणी चालू नका, लहान मुलांना बंद गाडीत ठेवू नका. मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेटेड पेये टाळा.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks