हे 'नारी शक्ती' नव्हे तर 'भाजप शक्ती' बिल:महिला आरक्षणाला विरोध नाही, पण मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या 'मनमानी'ला विरोध- संजय राऊत
![]()
महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध नाही, पण हे बिल पहिलेच मंजूर झाले आहे. महिला आरक्षणाला विरोध नाही, पण मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या ‘मनमानी’ला विरोध आहे आणि राहणार, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सरकारने विरोधकांशी चर्चा करायला हवी होती, मसुदा समोर आल्यावर काय चर्चा करणार? आठ दिवसांनी जर बिलावर चर्चा झाली तर काय मोठा फरक पडणार आहे? एवढी कसली घाई झाली आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, आम्ही मतदान करत नारी शक्ती विधेयकाला विरोध करत हे बिल पाडणार आहोत. 364 मते असल्याशिवाय हे मंजूर होणार नाही. सरकारकडे 292 मते आहेत, ते जास्तीत जास्त 300 होऊ शकतो. पण आमच्याकडे मोठा आकडा आहे, हे बिल मंजूर होऊ देणार नाही. बिलाला विरोध म्हणून सभा त्याग करणार नाही. सरकारला मतद करणारे देशाचे दुश्मन असतील. 2023 मध्येच बिल मंजूर संजय राऊत म्हणाले की, नारी शक्ती हे बिल 2023 मध्ये मंजूर झालेले आहे. केंद्र सरकार देशातील नागरिकांना फसवत आहे. त्या विधेयकामध्ये जनगणनेसंदर्भात काही चर्चा होत्या. हे बिल ऐतिहासिक आहे असे केंद्र सरकार म्हणत आहे. सध्या जितके खासदार आहेत त्यामध्ये महिलांना आरक्षण द्या, नवे मतदारसंघ निर्माण करत तुम्हाला हे बिल लादायचे आहे, सर्वांचा त्याला विरोध आहे. त्यांना हे बिल मंजूर करण्यासाठी बहुमत मिळणार नाही. नारी शक्ती बिल नसून केवळ भाजपा शक्ती बिल आहे. हे बिल आम्ही संसदेत मंजूर होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार संजय राऊत म्हणाले की, 5 राज्यात निवडणुका असताना हे बिल मंजुरीसाठी आणायची सरकारला काही गरज नव्हती. जर तुम्हाला ऐतिहासिक बिल मंजूर करायची आहे, लोकशाही मजबूत करायची आहे. महिलांचा लोकशाहीत सहभाग वाढवायचा आहे. पण अनेक खासदार सध्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना तुम्ही मतदानापासून रोखत बिल मंजूर करूण घेऊ असा सरकारचा प्रयत्न आहे. केरळमधील सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत, पश्चिम बंगालमधील सर्व खासदारांना आणायचा प्रयत्न आहे. तर द्रमुकचे सर्व खासदारही अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार आहे.
