डेटा सेंटर प्रकल्पांना मिळणार गती:करारानंतर कंपन्यांना तत्काळ जागा मिळणार, CM देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-18t195800647_1776522454.jpg




महाराष्ट्रात डेटा सेंटर क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले असून, मध्य आशियातील नामवंत कंपन्यांकडून येणारी गुंतवणूक लक्षात घेता त्यांना करारानंतर तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या एका विशेष बैठकीत डेटा सेंटर प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला होता. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, डेटा सेंटर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्यात याव्यात. विशेषतः जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. तसेच डेटा सेंटर प्रकल्पांसाठी अखंड वीजपुरवठा अत्यावश्यक असल्याने संबंधित कंपन्यांना प्राधान्याने वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले. ऊर्जा विभागाने यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. डेटा सेंटर प्रकल्पांना गती देण्यासाठी सिडकोमार्फत स्वतंत्र ‘लॅण्ड बँक’ विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वीज उपकेंद्रांसाठी जागा तत्काळ उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. या प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सिडकोकडून सुरू असून, डेटा सेंटर्सना लागणारा पुरेसा आणि अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित केला जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks