अकोल्यात खळबळ!:अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाडवर खंडणी प्रकरणात गुन्हा

0
orig_new-project-2026-04-15t065111072_1776216051.jpg




अकोल्याचे अपर जिल्हाधिकारी प्रमोद राहुल गायकवाड यांच्यावर खंडणी आणि लाच मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष विवेक प्रभाकर बिजवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी त्यांना फोन करून ते संघटनेचे कार्याध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडून १५ हजार रुपये आणि संघटनेच्या इतर प्रत्येक सदस्याकडून प्रतिमहिना ५ हजार रुपये देण्याची मागणी केली. हे पैसे न दिल्यास क्रशर पॉइंटची पाहणी करून कामकाज बेकायदा दाखवून ते बंद पाडण्याची धमकीही गायकवाड यांनी दिली होती. यानंतर बिजवे यांनी गायकवाड यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना १५ हजार रुपये दिले. मात्र, गायकवाड यांनी पुन्हा इतर सदस्यांकडून पैसे गोळा करून देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. मागणी पूर्ण न झाल्याने गायकवाड यांनी नायब तहसीलदार आणि इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून क्रशर पॉइंटवर पाठवून मोजमाप सुरू केले, असा आरोपही केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड सक्तीच्या रजेवर अपर जिल्हाधिकारी प्रमोद राहुल गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर यांना पुढील आदेशापर्यंत रक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांचा प्रभार उपजिल्हाधिकारी कटारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks