अमरावती हादरले!:180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; आरोपी मोहम्मद अयाजला बेड्या

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-14t165642116_1776165980.jpg




अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी संबंधित आरोपीने तब्बल 180 तरुणींचे शोषण करून त्यांचे 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक आरोप केल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत ही कारवाई केली असून, या खळबळजनक प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच, अमरावती जिल्ह्यातही मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या तरुणाने सुमारे 200 मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या खळबळजनक आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता त्याला 21 एप्रिलपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या धक्कादायक प्रकरणाचा अधिक तपास आता पोलिस यंत्रणेमार्फत केला जात आहे. आरोपी एमआयएमचा कार्यकर्ता- अनिल बोंडे परतवाडा पोलिसांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणी ताब्यात घेतलेला युवक एमआयएमचा कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला असून, हे केवळ एका व्यक्तीचे कृत्य नसून यामागे एक मोठी टोळी सक्रिय असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या टोळीने स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप्स तयार करून हे जाळे पसरवले असल्याचे सांगत, पोलिसांनी संबंधित आरोपींचे मोबाईल जप्त करून त्यांच्या कॉल डिटेल्सची आणि संपर्काची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणीही बोंडे यांनी यावेळी केली आहे. हे जाळे खूप मोठे पसरलेले अनिल बोंडे म्हणाले, या प्रकरणात काही मुस्लिम आणि हिंदू समाजाच्या मुली देखील आहेत. हे जाळे खूप मोठे पसरलेले आहे, आणि विशेष म्हणजे चिखलदरा हॉटेलमधील पोलिसांनी सीसीटीव्ही जप्त करून सहा महिन्यातील फुटेज तपासले तर त्या आधारे रॅकेट उघड होऊ शकतो. पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जायला पाहिजे आणि महिला अधिकाऱ्यांनी आणि सायबर मधील अधिकारी यांची नेमणूक केली पाहिजे, अशी मागणी देखील बोंडे यांनी केली आहे. सात पीडित तरुणींची नावे उघड दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून तपास सुरू केला असून, त्यामध्ये अनेक धक्कादायक अश्लील व्हिडिओ असल्याचे समजते. हे व्हिडिओ आरोपीने आपल्या मित्रांना पाठवले आहेत का, याचा शोध घेतला जात असतानाच त्याचे तरुणींसोबतचे काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले आहेत. आरोपीने पुराव्यांचा नाश करण्यासाठी मोबाईलमधील मोठा डेटा डिलीट केला असला तरी, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तो रिकव्हर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या एक वर्षापासून हा गैरप्रकार सुरू असल्याची कबुली आरोपीने दिली असून, प्राथमिक चौकशीत त्याने आतापर्यंत सात पीडित तरुणींची नावे उघड केली आहेत.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks