PNB Account Alert | ‘या’ बँक ग्राहकांसाठी धोक्याची घंटा! तुमचे पैसे अडकण्यापूर्वी ‘हे’ काम करा

0
Bank-Employees-Strik.webp.webp


PNB Account Alert | आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार सुलभ झाले असले तरी निष्क्रिय खात्यांबाबत एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) कडून अशा खात्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, ठराविक मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास खाती थेट बंद होऊ शकतात.

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) ने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, गेल्या तीन वर्षांपासून कोणताही व्यवहार न झालेली आणि शून्य शिल्लक असलेली खाती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खातेदारांसाठी 15 एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. जर या कालावधीत खाते पुन्हा सक्रिय केले गेले नाही, तर 16 एप्रिलपासून ती खाती कायमस्वरूपी बंद केली जातील. (inactive bank account)

बँकेने हा इशारा आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिला होता. विशेषतः एक्स वरून जारी केलेल्या सूचनेत ग्राहकांना वेळेत कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खातं बंद झाल्यास त्यानंतर व्यवहार करणे किंवा पैसे काढणे शक्य होणार नाही, त्यामुळे ग्राहकांनी वेळेत पावले उचलणे आवश्यक आहे.

PNB Account Alert | KYC पूर्ण करून खाते वाचवा :

अशा प्रकारची निष्क्रिय खाती पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना जवळच्या शाखेत जाऊन केवायसी (KYC – Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर किंवा खात्यात व्यवहार सुरू केल्यानंतर खाते पुन्हा सक्रिय होऊ शकते. त्यामुळे खातेधारकांनी विलंब न करता तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बँकेने ही कारवाई करण्यामागे सुरक्षेचे कारण दिले आहे. निष्क्रिय किंवा शून्य शिल्लक असलेल्या खात्यांमुळे फसवणुकीचा धोका वाढू शकतो, त्यामुळे अशा खात्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. ग्राहकांना त्यांच्या खात्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी संबंधित शाखेशी संपर्क साधावा, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

News title : PNB Account Closure Alert 2026

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks