जलविद्युत केंद्राच्या पिचिंगसाठी तीन वर्षांपूर्वी केलेला ७० लाख खर्च पाण्यात:कामांकडे अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप‎

0
transfar_app_177599031569db762bd9cab_1001828980.jpg




प्रतिनिधी | पैठण जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र अनेक वर्षांपासून बंद आहे. तीन वर्षांपूर्वी या केंद्राच्या पिचिंगचे काम ७० लाखांहून अधिक निधीतून करण्यात आले. पाणी सोडल्यानंतर ही पिचिंग वाहून गेली. आता काम अतिनिकृष्ट झाल्याचा आरोप होत असून पुन्हा आता ६ कोटीचा खर्च करून या पिचिंगवथ गार्ड वाँलचे काम सुरू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे जायकवाडी धरण आहे. धरण क्षेत्रातील १० मेंटेनन्सची विविध कामे करण्यासाठी पाटबंधारे विभागाने ६१ कोटी रुपये खर्चून दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. ही कामे बोगस होत असल्याचा आरोप आहे. या कामांकडे अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी येथे भेट दिली. सुरू असलेल्या कोट्यवधींच्या कामांच्या दर्जावर त्यांनी भाष्य केले नाही. त्यामुळे ६१ कोटींहून अधिक निधीतून होणारी १० दुरुस्तीची कामे निकृष्ट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मध्यंतरी ‘दिव्य मराठी’त वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कामात सुधारणा करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी सांगितले होते. मात्र नंतर उपअभियंता, शाखा अभियंता यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. कामाकडे अभियंता श्रद्धा निंबाळकर यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी पैठणमधील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी काम दर्जेदार करण्यात येईल, असे सांगितले. कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही कामे मात्र कोटीची जायकवाडी धरणावर मागणी तिन वर्षापासून शंभर कोटी जवळपास विविध तांत्रिक दुरुस्ती चे कामे सुरू आहे ही कामे व झालेली बोगस कामे याच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा येथे नाही येथील अधिकारी कामाचा दर्जा ठरवित आहे यामुळे कोटी च्या निधीची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू आहे. Ã कामाचा दर्जा उत्तम राहील जायकवाडीच्या जलविद्युत केंद्राच्या पिचिंगसाठी यापुर्वी ७० लाख खर्च करण्यात आले. मात्र पाणी सोडले यामुळे ती पिचिंग वाहून गेली, आता येथे गार्ड वाँल तयार करण्याचे काम सुरू आहे कामाचा दर्जा उत्तम राहील. तशा सुचना केले आहेत. – मंगेश शेलार, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed