कायगाव येथे महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात:पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
![]()
टाकळी जिवरग | सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. दुपारी तीन वाजता येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माजी मंत्री आमदार आब्दुल सत्तार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन अर्जुन गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, संचालक नंदकिशोर सहारे, सुखदेव जाधव, सरपंच राजेंद्र खरात, माजी सरपंच पांडुरंग जैवळ, ग्रामपंचायत सदस्य बबन दाभाडे, बबन जैवळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
