हातउसन्या पैशांवरून एकावर खुनी हल्ला:पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली
![]()
पुण्यात हातउसने पैशांवरून झालेल्या वादातून एकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. ही घटना ४ एप्रिल रोजी शंकरशेठ रस्त्यावरील धोबीघाट परिसरात घडली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रेहान उर्फ खिमा फिरोज शेख (वय २०), गौरव गणेश गुजर (वय २०) आणि अतिक हारून अत्तार (वय २१, तिघे रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदाराकडून हातउसने पैसे घेतले होते. याच पैशांवरून ४ एप्रिल रोजी आरोपी आणि तक्रारदारात धोबीघाट परिसरात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी तक्रारदारावर पिस्तूल रोखले आणि त्याला मारहाण केली. यावेळी तक्रारदारासोबत असलेल्या त्याच्या भाच्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू होता. पोलीस कर्मचारी सद्दाम तांबोळी आणि अझीम शेख यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, नागनाथ राख, उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विशाल दळवी, विनोद चव्हाण आणि संजय सरगर यांच्या पथकाने केली. इंदापूर येथील पंधारवाडी सहकारी सोसायटीच्या आवारात कारवाई नवीन पीक कर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी एक हजार रुपये स्वीकारणाऱ्या इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेड्या ठोकल्या. नाना चंद्रकांत बोराटे (वय ४३, रा. मु. पो. गोकळी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
