निसर्गाचा लहरीपणा आणि अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १४ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील ५ लाख १८ हजार १७७ शेतकऱ्यांना दुष्काळाची तीव्र झळ पोहोचली आहे. या सर्व बाधित . शासनाच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ स्वरूपात ५ हजार रुपयांचे अग्रीम अनुदान वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे ५ हजार रुपये लवकरच जमा होणार आहेत. तसेच, ज्या शेतकऱ्यांची पडताळणी अद्याप बाकी आहे, त्यांची प्रक्रिया गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करून त्यांनाही या मदतीचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. दुष्काळ घोषित होण्यापूर्वी जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १० तालुके बाधित झाले होते. वरुड, दर्यापुर, चांदूर बाजार आणि अचलपुर हे चार तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने कहर केला होता. त्यावेळी झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे केल्यानंतर शासनाने ३७ हजार १५ शेतकऱ्यांसाठी ४४ कोटी २१ लाख ३३ हजार ९० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ही रक्कमही त्या-त्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शासनाने अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात ५ हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्याचे काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले असून उद्या, गुरुवारच्या सायंकाळपर्यंत उर्वरित पडताळणीही पूर्ण होईल. दरम्यान प्रत्येकी ५ हजार रुपये जमा होणे सुरु झाले आहे. – आशिष येरेकर, जिल्हाधिकारी, अमरावती. सात तालुक्याचे काम ९० टक्क्यांवर पोहचले जिल्ह्यातील सात तालुक्यांचे काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित सात तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पडताळणीचे काम ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये तिवसा तालुक्यातील ३० हजार ९११ पैकी २६ हजार ३४४, चांदूर रेल्वे तालुक्यातील ३१ हजार ९२३ पैकी १८ हजार ९२६, नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील ४० हजार ९७५ पैकी २२ हजार ३१२, चांदूर बाजार तालुक्यातील ५० हजार ३२ पैकी ३७ हजार १४, मोर्शी तालुक्यातील ५४ हजार ५८६ पैकी ५० हजार ८३१, धारणी तालुक्यातील २२ हजार ५३० पैकी १३ हजार २३७ आणि वरुड तालुक्यातील ४४ हजार ६४३ पैकी ३४ हजार ७३९ शेतकऱ्यांचा डेटा मंजूर झाला आहे. जुलैच्या अतिवृष्टीधारकांसाठीही ४४.२१ कोटी मिळणार What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 26 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation किकवारी ग्रामपंचायतीचा जिल्हास्तरावर गौरव:समृद्ध पंचायतराज अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण सावंत यांना सन्मानपत्र ही सरळ सरळ हुकूमशाही:हक्कासाठी जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल, ऊस आंदोलन आणि गोकुळवरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर घणाघात