वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई; पाच ब्रास वाळूसह टिप्पर जप्त नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत वजिराबाद पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई केली. या कारवाईत पाच ब्रास वाळूसह एकूण १० लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर २०२६ रोजी विजराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाला हस्सापूर टी-पॉइंट येथे एका टिप्परमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एमएच-२६ सीएच-०९४७ क्रमांकाचा संशयित टिप्पर अडवून तपासणी केली. यावेळी वाहनात अंदाजे पाच ब्रास वाळू आढळून आली. वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी व कागदपत्रांची मागणी केली असता, संबंधितांकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून १० लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि २५ हजार रुपये किमतीची पाच ब्रास वाळू, असा एकूण १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पंडित दगडूजी गळे (वय ४०, रा. भनगी, नांदेड) यांच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३१७ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४८(७), ४८(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने आणि पोलीस अंमलदार ज्वालासिंग बावरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा नांदेड जिल्हा पोलिसांनी दिला आहे. तसेच अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. Post Views: 16 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 3 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation सुरज गुरव आता साताराचे अपर पोलीस अधीक्षक;नांदेडचे संदीप जाधव