महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल: आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या आणि मुदतवाढीचे आदेश जारी

मुंबई (प्रतिनिधी) –  महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी तीन वेगवेगळे शासन आदेश जारी करून भारतीय पोलीस सेवा आणि महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या आणि मुदतवाढीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.यात नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांना अपर पोलीस अधीक्षक पदावर सातारा येथे पाठवले आहे. तसेच नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक पद नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले संदीप जाधव याना देण्यात आले आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीत पदोन्नती व नवीन पदस्थापना

गृह विभागाच्या पहिल्या आदेशानुसार, पोलीस अधीक्षक निवडश्रेणीतील अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदी पदोन्नती देऊन त्यांच्या नवीन पदस्थापना करण्यात आल्या आहेत:

  • अविनाश बारगळ: प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर वरून पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई.
  • नंदकुमार ठाकूर: उपसंचालक/पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक वरून सहसंचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक.
  • अरविंद चावरिया: २६ मे २०२६ च्या आदेशान्वये त्यांची पदोन्नतीवर पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई येथे बदली दर्शवण्यात आली होती; मात्र नवीन आदेशाद्वारे त्यांना प्रतीक्षाधीन ठेवण्यात आले असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जारी केले जातील.

वरिष्ठ समय श्रेणी पदोन्नती

गृह विभागाच्या दुसऱ्या आदेशानुसार, २०२१ तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी दर्शन दुगड (सहायक पोलीस अधीक्षक/उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प, नाशिक ग्रामीण) यांना १ जानेवारी २०२६ पासून वरिष्ठ समय श्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व मुदतवाढ

गृह विभागाच्या तिसऱ्या आदेशानुसार, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ च्या शिफारशींनुसार विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या व मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे:

अ) भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या:

  • अनमोल मित्तल: अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण वरून अपर पोलीस अधीक्षक, आंबेजोगाई, बीड.
  • आकांक्षा यादव: उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग वरून उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर.

ब) १ वर्ष मुदतवाढ मिळालेले अधिकारी:

  • शिवराज पाटील: पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोकण परिक्षेत्र.
  • अमरसिंग जाधव: पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर.
  • प्रशांत कदम: पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५, ठाणे शहर.

क) इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना:

  • मीना मखवाना: पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, ठाणे शहर वरून अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण.
  • शैली ईश्वर कडूकर: अपर पोलीस अधीक्षक, सातारा वरून पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे.
  • चेतना तिडके: अपर पोलीस अधीक्षक, आंबेजोगाई, बीड वरून पोलीस अधीक्षक, अभियान, अमली पदार्थ विरोधी पथक, नागपूर.
  • जयंत बजबळे: पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे वरून पोलीस उपायुक्त, ठाणे शहर.
  • सूरज गुरव: अपर पोलीस अधीक्षक, नांदेड वरून अपर पोलीस अधीक्षक, सातारा.
  • संदिप जाधव: प्रतीक्षाधीन वरून अपर पोलीस अधीक्षक, नांदेड.
  • नरसिंग यादव: प्रतीक्षाधीन वरून पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे.
  • धनंजय अनंत जाधव: सहायक पोलीस आयुक्त, व्हीआयपी सुरक्षा वरून पोलीस उपअधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा.
  • विकास संपत नाईक: पोलीस उपअधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर वरून अपर उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.
  • संकेत सतीश गोसावी: पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे वरून उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग.
  • कुमार भिकाजी चौधरी: उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर वरून पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक.
  • सुधीर पुंडलिक नांदनवार: प्रतीक्षाधीन वरून उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा.
  • संतोष वैरागडे: सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक वरून उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प, नाशिक.
  • श्रीकांत चंद्रकांत कांकळे: पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड वरून पोलीस उपअधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, किनवट.

 


Post Views: 100










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search