सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या दोन मतदारसंघांत मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. तासगाव सोसायटी गटात माजी आमदार सुमनताई पाटील यांना अवघ्या एका मताने धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल . तासगाव सोसायटी गटातील निवडणूक ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्याविरोधात माजी खासदार संजयकाका पाटील रिंगणात होते. मतमोजणीत संजयकाका पाटील यांना 39 मते मिळाली, तर सुमनताई पाटील यांना 38 मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या एका मताच्या फरकाने सुमनताई पाटील यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. हा निकाल आमदार रोहित पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासाठीही मोठा फटका मानला जात आहे. जतमध्ये गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय दुसऱ्या बाजूला, जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पडळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांचा 20 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या लढतीत गोपीचंद पडळकर यांना 54 मते मिळाली, तर विनोद पवार यांना 34 मते पडली. निकाल जाहीर होताच मिरज येथील मतमोजणी केंद्राबाहेर पडळकर समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. बँकेवर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचेच वर्चस्व वैयक्तिक स्तरावर संजयकाका पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला असला, तरी सांगली जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे बँकेच्या सत्तेवर महाविकास आघाडीचेच वर्चस्व कायम राहणार असून, अध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे. हे ही वृत्त वाचा अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक:खासदार नीलेश लंके विजयी; पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात विखे समर्थकाचा पराभव अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या उर्वरित 10 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत पहिला मोठा निकाल समोर आला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पारनेर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून खासदार नीलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी विखे समर्थकांचा पराभव करत या प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारली आहे. वाचा सविस्तर सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल:शंभूराज देसाईंचा पाटणमध्ये विजय, भाजपला धक्का; जावळीत शिवेंद्रराजेंच्या समर्थकाची बाजी राज्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर, पहिल्याच तासात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी दणदणीत विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. वाचा सविस्तर What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!:5 हजारांची अग्रीम मदत खात्यात जमा व्हायला सुरुवात; 31 हजार कोटींच्या प्रस्तावावर प्रताप सरनाईकांची मोठी माहिती पार्थ पवारांच्या कार्यशैलीवर बड्या नेत्यांचा आक्षेप?:ज्येष्ठ नेत्यांच्या दिल्लीवारीने दुफळीच्या चर्चांना उधाण, कृषिमंत्री भरणेंसह बडोलेंनी केले खंडन