राज्यात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी पीक विम्याची आणि सरकारी मदतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत सोमवारपासून देण्यास सुरुवात झाली असून, दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी मोठ्या आणि भरीव मदतीची घोषणा केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ‘दिवाळीनंतर लवकरात लवकर मदत जाहीर करणार’ पत्रकारांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “पाच हजार रुपयांची अग्रीम मदत सोमवारपासून सुरू झाली आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जी ९ सदस्यीय उपसमिती स्थापन केली आहे, त्याचा मी एक सरकारी सदस्य आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त भरीव मदत कशी मिळवता येईल, यासाठी मी प्रयत्न करत आहे. सध्या दिवाळीची सुट्टी आहे, परंतु या सुट्टीनंतर सरकार निश्चितपणे लवकरात लवकर मोठी मदत जाहीर करेल.” ३१,००० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार? या प्रश्नावर उत्तर देताना सरनाईक म्हणाले, “मदतीच्या आकड्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याची राज्य शासनाची ठाम भूमिका आहे. राज्याच्या कृषी खात्याने तब्बल ३१,००० कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी भूमिका घेतल्याचे मला समजते. आता केंद्राकडून आपल्याला किती मदत मिळते, याची आम्ही माहिती घेत आहोत.” राज्याकडूनही अतिरिक्त मदतीचा प्रयत्न: केंद्राकडून मदत मिळाल्यानंतरही राज्य सरकार गप्प बसणार नाही, असे संकेत सरनाईक यांनी दिले. “केंद्राची मदत मिळाल्यानंतर सुद्धा, ज्या विभागांमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त नुकसान झालेले आहे, त्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसा फायदा देता येईल, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत,” अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रताप सरनाईक यांच्या या माहितीमुळे, दिवाळीच्या सणात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीनंतर मोठ्या मदतीची आशा निर्माण झाली आहे. आता राज्य सरकार दिवाळीनंतर नेमके किती रुपयांचे पॅकेज जाहीर करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. ———— हेही वाचा.. माझ्याकडे चार नाही, अनेक ऑडिओ क्लिप्स: वेळ आल्यावर आणखी बॉम्ब फोडणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना थेट आणि इशारा दिला आहे. “माझ्याकडे फक्त चार ऑडिओ क्लिप्स नाहीत, तर अशा अनेक क्लिप्स आहेत. जर सरकारने आमच्याविरोधात सुरू असलेले हे षडयंत्र थांबवले नाही, तर मी लवकरच आणखी काही ऑडिओ बॉम्ब फोडणार आहे,” असा खळबळजनक इशारा जरांगे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation कारखानदारांची बैठकीला दांडी; प्रशासनाची ऊस दरासाठी 3 दिवसांची मुदत:जिल्हा प्रशासनाच्या सोलापुरातील बैठकीला एकही कारखानदार फिरकला नाही Sangli District Bank Election Result; Sanjaykaka Patil Defeats Sumantai Patil