कॉर्पोरेट जिहादमध्ये मुलींना गोमांस खाण्यास भाग पाडले- मंत्री महाजन:नाशिकच्या आयटी कंपनीत पैसे, नोकरीचे आमिष, मुली-मुलांचे धर्मांतर
![]()
नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले..मुंबईचेदेखील काही वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी बारकाईने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी आयटी कंपनीची एचआर हेड अश्विनी चेनानीला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पाच संशयित आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार, शफी शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. गुन्ह्यातील संशयित दानिश न्यायालयीन कोठडीत आहे. नाशिक येथील विश्रामगृहावर शुक्रवारी (दि. १०) बोलताना मंत्री महाजन यांनी या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला. त्याचा अत्यंत कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे. तशा सूचनाही त्यांना दिल्या आहेत. कुठलाही दोषी सुटणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसेच नाशिकमध्ये अशा कंपन्यांत अजून कुठे काही घटना घडल्या आहेत का, याबाबत देखील चौकशी सुरू आहे. कंपन्यांमधील विशाखा समित्या सक्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पीडितांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन करताना महाजन यांनी संबंधितांची ओळख गोपनीय ठेवण्याचेही आश्वासन दिले. सिंहस्थाची कामे अडविल्यास कारवाई होणारच कुंभमेळ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये, असे निर्देश देण्यात आले. कोणीही कामात अडथळा आणत असल्यास पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले असून मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मंत्री महाजन यांनी दिला. मोठ्या रॅकेटचा संशय यात मोठे रॅकेट असावे. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. कुठलाही दोषी सुटणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसेच नाशिकमध्ये अशा कंपन्यांत अजून कुठे काही घटना घडल्या आहेत का, याबाबत चौकशी सुरू आहे. विशाखा समित्या सक्रिय आहेत. पीडितांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे, असेही महाजन यावेळी म्हणाले.
