हुंड्यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ आणि गंभीर आजारपणात वेळेवर उपचार न मिळाल्याने विवाहितेचा पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती अल्ताफ शेख याच्यासह सासरच्या नऊ जणांविरोधात मृत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, विवाहावेळी माहेरच्या मंडळींनी सुमारे दहा लाख रुपये खर्च केले होते. मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून आणखी पैशांची मागणी सुरू झाली. किराणा मालासारख्या जीवनावश्यक गरजांकडे दुर्लक्ष करणे, उपाशी ठेवणे, शिवीगाळ आणि मारहाण करून तिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप आहे. विवाहितेला दाढदुखी आणि अतिरक्तस्रावाचा त्रास सुरू असतानाही सासरच्यांनी उपचारांकडे दुर्लक्ष केले. उपचारांसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला माहेरी सोडण्यात आले. नातेवाईकांनी तिला पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल केले; मात्र १९ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू हा छळ आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. संबंधितांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहेरच्या नातेवाईकांनी केली आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 20 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation President Murmu Inaugurates Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela 2026 शेतकऱ्यांना 5 हजार, कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी:रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, निधीचा हिशोब मागितला