राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या खर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “एकीकडे दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातावर ५ हजार रुपये टेकवून सरकार त्यांची थट्टा करत आहे, तर दुसरीकडे नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली ३५ हजार कोटी रुपये खर्चाचा हिशोब द्यायला सरकार तयार नाही,” असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे. कुंभमेळ्याच्या कामातील माहिती अधिकारात (RTI) दडवली जात असल्याचा आरोप करत पवारांनी आज थेट वृत्तपत्रात ‘जाहीर नोटीस’ प्रसिद्ध करून सरकारविरोधात कायदेशीर लढाईचे रणशिंग फुंकले आहे. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर या संदर्भातील सविस्तर पोस्ट करून सरकारला थेट आव्हान दिले आहे. शेतकऱ्यांची थट्टा आणि कुंभमेळ्यातील उधळपट्टी राज्यातील शेतकरी दुष्काळाने त्रस्त असताना त्यांना मिळणाऱ्या मदतीवर पवारांनी बोट ठेवले. “अन्नदाता शेतकरी भीषण दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना, हे सरकार त्याच्या हातावर ५ हजार रुपये टिकल्या टेकून त्याची थट्टा करत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या ३५,००० कोटी रुपये खर्चाचा कोणताही हिशोब द्यायला सरकार तयार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. कुंभमेळ्याच्या कामांत अनियमितता आणि भ्रष्टाचार कुंभमेळ्याच्या निधीतून होणाऱ्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. यातील काही माहिती आपल्याकडे असून, अधिकृत पातळीवर सरकारकडून काय माहिती मिळते हे पाहण्यासाठी आपण विविध शासकीय विभागांकडे पत्रव्यवहार केला आणि माहिती अधिकारात (RTI) अर्ज दिले, मात्र जाणीवपूर्वक ही माहिती दडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘जनतेच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणारे महाभाग कोण?’ रोहित पवार म्हणाले, “जनतेच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणारे हे महाभाग कोण आहेत आणि त्यांना कोण पाठीशी घालतंय? सरकार माहिती का लपवतंय, हे आम्हाला पाहायचंच आहे.” वृत्तपत्रात ‘जाहीर नोटीस’ आणि कायदेशीर लढाई माहिती दिली नाही म्हणून आपण शांत बसणार नसल्याचा इशारा देत पवारांनी पुढील पाऊल उचलले आहे. “आज थेट वृत्तपत्रात ‘जाहीर नोटीस’ प्रसिद्ध करून कायदेशीर लढाईचं रणशिंग फुंकलं आहे. सर्व कायदेशीर हत्यारांचा वापर करून आम्ही ही लपवलेली माहिती बाहेर काढू. पवित्र कुंभमेळ्याच्या नावाखाली नक्की कुणाचे खिसे भरले गेले, याचा काळाबाजार जनतेच्या न्यायालयात आणल्याशिवाय हा लढा थांबणार नाही,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. रोहित पवारांकडून जाहीर नोटीस ——————– हेही वाचा.. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात: राष्ट्रपती मुर्मू ध्वजस्तंभ पूजन, ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होणार; 22 महिने चालणार
नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे आजपासून सिंहस्थ महाकुंभ मेळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. दुपारी 12:02 वाजता रामकुंड येथे ध्वजारोहण होईल, ज्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होतील. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन धार्मिक शहरांमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ भरतो. लाखो भाविक गोदावरी नदीत पवित्र स्नान करतात. नाशिकमध्ये रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर स्नान केले जाते. सविस्तर वाचा

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search