Pearl Gemstone | ‘मोती’ रत्न कोणी धारण करावा, काय आहेत नियम? जाणून घ्या
Pearl Gemstone | ज्योतिषशास्त्रामध्ये मोती (Pearl) रत्नाला शीतलतेचे आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. हे रत्न चंद्र ग्रहाशी संबंधित असून त्याचा थेट परिणाम मानवी मन, भावना आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो. ज्या व्यक्तींचे मन विचलित असते किंवा ज्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते, त्यांच्यासाठी मोती हे एक वरदान ठरू शकते.
मोती धारण करण्याचे प्रमुख फायदे
मोती धारण केल्याने अतिविचार आणि मानसिक तणाव कमी होऊन मन शांत राहते. ना छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येतो किंवा चिडचिड होते, त्यांच्या स्वभावात मोत्यामुळे सकारात्मक बदल घडतात. चंद्राचे शुभ फळ मिळाल्यामुळे व्यक्तीचा स्वतःवरील विश्वास वाढतो आणि निर्णयक्षमता सुधारते. ज्योतिषीय मान्यतेनुसार, सर्दी-खोकला किंवा श्वसनाशी संबंधित त्रासांमध्ये मोती धारण केल्याने आराम मिळू शकतो.
कोणासाठी शुभ आणि कोणासाठी वर्ज्य?
मोती प्रत्येकासाठी फायदेशीर असतोच असे नाही, त्यामुळे कुंडलीचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे:
सर्वात शुभ – कर्क रास (कारण चंद्राचे स्वतःचे अधिपत्य आहे).
मिथुन, कुंभ, मकर आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय मोती घालू नये.
वर्ज्य (टाळावे) – वृश्चिक रास आणि ज्यांच्या कुंडलीत चंद्र ६ व्या, ८ व्या किंवा १२ व्या स्थानी आहे. त्यामुळे या राशिंच्या व्यक्तींनी मोती घालणं टाळावं.
मोती धारण करण्याचे नियम आणि योग्य पद्धत
मोत्याचा पूर्ण प्रभाव मिळवण्यासाठी तो शास्त्रीय पद्धतीने परिधान करणे आवश्यक आहे. मोती नेहमी सोमवारी परिधान करावा. क्ल पक्षातील सोमवार या कामासाठी सर्वात उत्तम मानला जातो. मोती नेहमी चांदीच्या अंगठीतच जडवून घ्यावा. तो उजव्या हाताच्या करंगळीत (Little Finger) धारण करावा. मोती हे एक अत्यंत प्रभावी रत्न आहे. त्यामुळे ते धारण करण्यापूर्वी अनुभवी ज्योतिषाकडून आपली कुंडली तपासून घेणे हिताचे ठरते, जेणेकरून त्याचे कोणतेही नकारात्मक परिणाम होणार नाहीत.
