शरद पवारांकडे 61 तर सुनेत्रांकडे 122 कोटींची संपत्ती:बारामतीच्या सूनबाई सासऱ्यांपेक्षा दुप्पट श्रीमंत, पण नणंदेपेक्षा कमी
बारामतीवर अधिराज्य गाजवणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या श्रीमंतीचे अनेक किस्से सांगितले जातात. त्यातील काही आकडे समोर आले आहेत. त्यानुसार शरद पवारांपेक्षा त्यांच्या सूनबाई म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुप्पट धनवान आहेत. अर्थात यात दिवंगत पती अजित पवा
.
सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाची (दिवंगत पती अजित पवार व इतर) एकत्रित संपत्ती सुमारे १२१.७९ कोटी रुपये आहे. सुनेत्रांची खरी ताकद त्यांच्या जमिनींमध्ये आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या नावे ६७.६७ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यात बारामतीतील मौल्यवान शेतजमीन आणि व्यावसायिक इमारतींचा मोठा वाटा आहे. कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता ८७ कोटींहून अधिक आहे.

राज्यसभा, बारामती पोटनिवडणुकीत दाखल प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड
वाहन : शरद पवारांकडे स्वतःची गाडी नाही. सुनेत्रांकडे टोयोटा कॅमरी (३७.६५ लाख), इनोव्हा (३८.३९ लाख), ५-६ ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स आहेत. त्यांच्या जंगम मालमत्तेचे मूल्य २३.२५ कोटी रु. आहे. १६.५३ कोटींचे कर्जही आहे.
शरद पवार: ८६ वर्षीय शरद पवारांनी जमिनीपेक्षा शेअर्स आणि मुदत ठेवींत जास्त गुंतवणूक केली. ४४.७१ कोटी रु.ची ‘जंगम’ मालमत्ता आहे. पत्नी प्रतिभा यांच्या नावे २७.७७ कोटी गुंतवणूक आहे. पवारांवर ४९ लाखांचे कर्ज आहे.
