व्याजाच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या आणि खंडणी उकळणाऱ्या गुन्हेगारी टोळीच्या अनेक गोष्टींचा पर्दाफाश झाला आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात राहुल साहेबराव चाबुकस्वार आणि प्रवीण पंडितराव गरबडेसह त्यांच्या साथीदारांविरोधात सावकारी कायदा आणि खंडणीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘डबल मोक्का’ लावलेल्या याच कुख्यात टोळीचा महिनाभरातील हा तिसरा गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे. तक्रारदार अक्षय अशोक सूर्यवंशी (रा. गारखेडा परिसर) यांची वाळूज एमआयडीसी येथे ‘रुद्रा इंजिनिअरिंग’ नावाची कंपनी आहे. कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याने आणि ती पुन्हा सुरू करण्यासाठी २० लाख रुपयांची गरज असल्याने त्यांनी ओळखीच्या प्रवीण गरबडे याच्याशी संपर्क साधला. गरबडे याने राहुल चाबुकस्वार याच्याशी ओळख करून देत १० टक्के व्याजाने ही रक्कम मिळवून देण्याचे सांगितले. मात्र, त्या बदल्यात महिंद्रा थार गाडी आणि कंपनीतील मशिनरीची इसार पावती गहाण म्हणून लिहून घेण्यात आली. फिर्यादीनुसार, ठरलेल्या व्यवहारापोटी त्यांनी वेळोवेळी व्याजाची व मुद्दलाची मिळून एकूण २७ लाख ५० हजार रुपयांची मोठी रक्कम आरोपींना परत केली. असे असतानाही आरोपींनी मुद्दल व व्याजाच्या नावाखाली आणखी ३५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत आरोपींनी १० ते १२ गुंडांना सोबत घेऊन फार्महाऊसवर व राहत्या घरी धडक दिली. एवढेच नव्हे तर, दबावतंत्राचा वापर करून फिर्यादीच्या आई-वडिलांकडून त्यांच्या राहत्या घराचा बळजबरीने इसारपावती व करारनामा लिहून घेतला. फिर्यादीच्या अर्जावरून पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निर्भयपणे तक्रार द्यावी हे आरोपी किंवा अशा प्रकारे अन्य कुणी अवैध सावकारी करून कर्जाच्या वसुलीसाठी धमकी, दमदाटी, मारहाण, शिवीगाळ अथवा जबरदस्ती करत असल्यास, पैशासाठी धमकावून मालमत्ता देण्यास भाग पाडत असेल तर नागरिकांनी थेट गुन्हे शाखा येथे निर्भयपणे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 24 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation दुष्काळामुळे एडीसीसी बँकेची निवडणूक पुढे ढकलली:शासनाने सहकारी संस्थाओं के चुनाव अगले आदेश तक रोके; अमरावती जिले की 146 संस्थाएं प्रभावित