राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या:श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात, 'पोकरा'च्या प्रकल्प संचालकपदी मीनल करनवाल, कुणाला कुठे संधी?
![]()
राज्य शासनाने आज (७ एप्रिल २०२६) प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ स्तरावर मोठे फेरबदल केले आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, यामध्ये जळगाव, नाशिक, पुणे आणि मंत्रालयातील विविध महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची नियुक्ती आता मुंबईतील महत्त्वपूर्ण अशा ‘पोकरा’ प्रकल्पाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. तर श्वेता सिंघल यांनी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात बदली करण्यात आली आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये नवीन नेतृत्व मीनल करनवाल (२०१९ बॅच): जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून त्यांची बदली आता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई या महत्त्वाच्या पदावर झाली आहे. करिश्मा नायर (२०२१ बॅच): नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून त्यांची नियुक्ती आता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव म्हणून करण्यात आली आहे. अमित रंजन (२०२२ बॅच): यवतमाळमधील पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकारी पदावरून त्यांची पदोन्नती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नाशिक म्हणून करण्यात आली आहे. मंत्रालयातील फेरबदल आणि इतर महत्त्वाच्या नियुक्त्या श्वेता सिंघल (२००९ बॅच): यांची नियुक्ती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे विशेष निवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. गीतांजली बाविस्कर (२०१५ बॅच): खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून त्यांची बदली सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय येथे झाली आहे. डॉ. दिलीप जगदाळे (२०१५ बॅच): महावितरण (कल्याण) च्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांची बदली सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय येथे करण्यात आली आहे. पुणे आणि कल्याणमधील बदल राहुल रंजन महिवाल (२००५ बॅच): महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (पुणे) च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांची नियुक्ती आता सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे म्हणून करण्यात आली आहे. रुचेश जयवंशी (२००९ बॅच): यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे या पदावर झाली आहे. कान्हूराज बगाटे (२०११ बॅच): यांची नियुक्ती संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण म्हणून करण्यात आली आहे.
