Maruti Suzuki New Cars | मारुती सुझुकीच्या ‘या’ ४ नव्या कार लवकरच लाँच होणार; फीचर्स पाहून थक्क व्हालं

0
Maruti-Suzuki-New-Cars-1.webp.webp


Maruti Suzuki New Cars | भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या Maruti Suzuki कडून वाहनप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कंपनी लवकरच भारतीय बाजारात चार नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. या यादीत लोकप्रिय SUV Maruti Suzuki Brezza चे फेसलिफ्ट व्हर्जन, Maruti Suzuki Wagon R चे अपडेटेड मॉडेल, एक नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही आणि Maruti Suzuki Grand Vitara चा फेसलिफ्ट यांचा समावेश आहे. या कारमध्ये डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.

अलीकडेच कंपनीने आपली इलेक्ट्रिक SUV Maruti Suzuki e Vitara सादर केली होती. त्यानंतर आता कंपनी आणखी काही नवीन मॉडेल्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या कारमुळे कंपनीचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन Maruti Suzuki Brezza फेसलिफ्टमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल अपेक्षित आहेत. यामध्ये रिडिझाइन बंपर, नवीन रेडिएटर ग्रिल, अपडेटेड एलईडी हेडलाईट्स आणि टेललाईट्स, तसेच 16 इंचाचे नवीन अलॉय व्हील्स मिळू शकतात. याशिवाय या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफचा पर्यायही देण्याची शक्यता आहे. इंटेरिअरमध्ये 10.1 इंचाचा मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आणि वेंटिलेटेड फ्रंट सीट्ससारखे प्रीमियम फीचर्स मिळू शकतात.

दुसरीकडे Maruti Suzuki Wagon R च्या थर्ड जनरेशनचे दुसरे फेसलिफ्ट मॉडेलही लाँच होण्याची शक्यता आहे. या अपडेटमध्ये रेडिएटर ग्रिलचा डिझाइन बदलला जाऊ शकतो तसेच नवीन कलर ऑप्शनही दिले जाऊ शकतात. इंटेरिअरमध्ये यूएसबी टाईप-सी पोर्टसारखी काही नवीन फीचर्स मिळू शकतात. सीएनजी व्हेरिएंटमध्ये अंडरबॉडी सीएनजी टँक दिल्यामुळे बूट स्पेस वाढण्याची शक्यता आहे.

Maruti Suzuki New Cars | नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही आणि ग्रँड व्हिटाराचा फेसलिफ्ट :

कंपनी लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे. ‘YMC’ कोडनेम असलेले हे मॉडेल इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या कारमध्ये दोन बॅटरी पर्याय मिळू शकतात. बेस व्हेरिएंटमध्ये सुमारे 400 किमी रेंज मिळण्याची शक्यता आहे, तर टॉप व्हेरिएंटमध्ये सुमारे 500 किमीपर्यंत रेंज मिळू शकते. ही कार भारतीय बाजारात Kia Carens च्या इलेक्ट्रिक व्हर्जनला टक्कर देऊ शकते. (Maruti Suzuki New Cars)

याशिवाय Maruti Suzuki Grand Vitara च्या फेसलिफ्ट मॉडेलमध्येही मोठे अपडेट मिळण्याची शक्यता आहे. या कारमध्ये नवीन बंपर, 17 इंचाचे अलॉय व्हील्स, अपडेटेड हेडलाईट्स आणि टेललाईट्स दिले जाऊ शकतात. तसेच लेव्हल-2 अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS), 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम यांसारखी आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

News Title: Maruti Suzuki to Launch 4 New Cars in India: Brezza Facelift, Wagon R Update and Electric MPV Coming Soon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed