नांदेड(प्रतिनिधी) -दहा हजार रुपये कर्जाने देवून त्याचे 70 हजार रुपये मागणी करणाऱ्या के.एफ.इंटरप्राईजेस अर्थात खालसा फायनान्सच्या कार्यालयातच 37 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्यानंतर अपहरण करून खून करणे अशा सदरात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलीसांनी तीन आरोपींना काल अटक केली. आज त्या आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी भाऊसाहेब मोरे यांनी —- दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.ज्योती चंद्रकांत शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांचे पती चंद्रकांत दगडोजी शिंदे (37) यास दोन जण दुचाकीवर बसवून घेवून जात असतांना त्यांनी मला इशारा केला आणि संध्याकाळी फोन करण्यास सांगितले. सायंकाळी मोबाईल क्रमंाक 9156940692 यावरून फोन आला आणि आमच्या फायनान्सचे दहा हजार रुपये उचलले आहेत. त्याचे 75 हजार रुपये व्याजासह ऑफीसला आणून जमा करा तरच चंद्रकांतला सोडतो असे सांगितले. यावेळी चंद्रकांतच्या आई बोलत होत्या. त्यांनी फोनकर्त्यांना सांगितले की, दोन दिवसात सोयाबीन विकून तुमचे पैसे आणून देतो. पुन्हा 24 ऑक्टोबर रोजी माझी मुलगी रुपालीने 9156940692 यावर दुसऱ्या फोनने फोन लावता तर तो फोन कोण्या महिलेने उचलला आणि चंद्रकांतला फोन देण्यासाठी सांगिेतले तेंव्हा ते झोपले असल्याचे सांगून फोन बंद करण्यात आला.24 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास माझे पती चंद्रकांत शिंदे मयत झाल्याचे कळाले. आम्ही येवून पाहिले असतांना के.एफ. इंटरप्राईजेसच्या कार्यालयातील फॅनमध्ये माझ्या पतीचा मृतदेह अडकलेला होतो. या संदर्भाने माझ्या पतीला घेवून येणारे दोन आणि खालसा फायनान्सचा मालक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा. त्यानुसार वजिराबाद पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(1)(2), 103(1), 142, 127(2), 3(5)प्रमाणे गुन्हा क्रमांक 533/2026 दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल दुरपडे यांच्याकडे आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी तपासात समोर आलेल्या वस्तूनिष्ठ माहितीप्रमाणे जयकुमार उर्फ शेरा भगवान गायकवाड (21) रा.गोपाळचावडी सिडको नांदेड, शेख आमेर शेख साहेब हुसेन(23) रा. देगलूर नाका नांदेड, इमरान खान शाहबाज खान (40) रा.गोवर्धनघाट टेकडी नांदेड यांना पकडले.आज सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल दुरपडे, पोलीस उपनिरिक्षक सुनिल बुलंगे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दर्शने, पोलीस अंमलदार भाऊसाहेब राठोड, शेख जफर, विलास कदम, ज्वालासिंग बावरी, संतोष गिते, भगवान बोंडगे आदींनी पकडलेल्या तिघांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. सरकारी वकिल के.एम. पट्टेबहादूर यांनी तपसाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे मुद्दे न्यायालयासमक्ष मांडले. आरोपींच्यावतीने सुध्दा बचावासाठी युक्तीवाद करण्यात आला. या प्रकरणात पोलीसांना अजून पाच जणांना अटक करायची आहे. त्यांची नावे मन्टूसिंग मेजर रा.नांदेड, असलम रा.परभणी, सुमेध डोईबळे रा. चंदासिंग कॉर्नर, शोयब तथा सलमान दोघे रा.परभणी अशी आहेत. यामध्ये पाच जणांची नावे अपूर्णपणे माहित आहेत.सोबतच त्या दिवशी तेथील सीसीटीव्हीचे डीसीआर कोणी तेथून काढून पाठविले याचा शोध होणे आहे. पळून गेलेल्या आरोपींचे संपुर्ण नाव माहित होणे आणि त्यांचा ठिकाणा माहित होणे आवश्यक आहे. खालसा फायनान्समध्ये अजून किती भागिदार आहेत. याचा शोध घ्यायचा आहे. तिन अटक आरोपींच्या मोबाईलचा डाटा तपासायचा आहे अशी अनेक कारणे न्यायालयासमक्ष आल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी भाऊसाहेब मोरे यांनी अटक करण्यात आलेल्या तिघांना —- दिवस अर्थात — ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. Post Views: 10 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation सर्वोच्च न्यायालयाची लक्तरे वेशीवर! मोदी सरकारपुढे सरन्यायाधीश झुकले? माजी न्यायमूर्तींच्या पुस्तकाने दिल्ली दरबारात खळबळ!