CBSE 10th Result 2026 | विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 10वी CBSC बोर्डाचा निकाल कधी लागणार? पाहा महत्वाची माहिती

0
Maharashtra-SSC-Result-2025.webp.webp


CBSE 10th Result 2026 | देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेला CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने आपले गुणपत्रक पाहू आणि डाउनलोड करू शकतील.

यंदा देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट तसेच DigiLocker आणि UMANG अ‍ॅपच्या माध्यमातूनही डिजिटल मार्कशीट डाउनलोड करता येणार आहे.

यावर्षी देशभरातील सुमारे 25 लाख विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या परीक्षांचे आयोजन 17 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत करण्यात आले होते. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी देशभरात एकूण 8,074 परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती. (CBSE Class 10 Result)

गेल्या काही वर्षांच्या ट्रेंडनुसार सीबीएसईचा निकाल साधारणपणे मे महिन्यात जाहीर केला जातो. मात्र यावर्षी मूल्यांकन प्रक्रिया वेगाने सुरू असल्याने निकाल अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी निकाल पाहण्यासाठी आवश्यक तपशील आधीच तयार ठेवणे आवश्यक आहे.

CBSE 10th Result 2026 | निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती :

सीबीएसईचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे काही महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे. यात रोल नंबर, शाळा क्रमांक, ॲडमिट कार्ड आयडी आणि जन्मतारीख यांचा समावेश आहे. या तपशीलांच्या मदतीने विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून निकाल पाहू शकतात.

निकाल कुठे पाहता येईल? :

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवरून आपला निकाल पाहू शकतात.

cbse.gov.in
results.cbse.nic.in
results.nic.in
results.digilocker.gov.in
umang.gov.in

DigiLocker वरून निकाल कसा डाउनलोड कराल? :

विद्यार्थी आणि पालक DigiLocker अ‍ॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून डिजिटल मार्कशीट डाउनलोड करू शकतात. त्यासाठी प्रथम DigiLocker वर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर ‘CBSE’ विभाग निवडून आवश्यक तपशील भरल्यास गुणपत्रक डाउनलोड करता येते. हे डिजिटल प्रमाणपत्र भविष्यातील शैक्षणिक प्रक्रियेसाठी वैध मानले जाते.

News Title: CBSE Class 10 Result 2026 Expected Soon: Check Scorecard on DigiLocker and Official Websites

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed