बारामती पोटनिवडणुकीतून लक्ष्मण हाकेंची माघार:दत्तात्रय भरणेंच्या चर्चेला यश; माझे प्रश्न आणि माझी लढाई सुरूच राहणार- हाके
![]()
बारामती पोटनिवडणूक विणविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आहे. लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर भरणे यांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर भरणे यांनी आमची सकारात्मक चर्चा झाल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. लक्ष्मण हाके व भरणे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. अजित पवारांचे अपघाती निधन झाले आणि त्यामुळे या राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली. सर्वांशी आपुलकीने वागणारा नेता आज आपल्यात नाही. त्यामुळे ही निवडणूक सुनेत्रा पवार लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी तसेच लक्ष्मण हाके यांनी त्यांना सहकार्य करावे ही विनंती करण्यासाठी आलो. मी चर्चा केली आणि आपण माघार घेणे का गर्जेचे आहे ते त्यांना समजावून सांगितले आहे. हाके सर चांगल्या गोष्टीला नेहमीच पाठिंबा देतात, अशी त्यांची भूमिका राहिली आहे. मला वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आले- लक्ष्मण हाके यावर पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, हे बघा बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे, ही वस्तुस्थिती आहे. असे असताना सुद्धा आम्ही काही प्रशांवर लक्ष वेधून घेण्यासाठी, मी काही कुठल्या पक्षाचा नाही. तरीही मी या पोटनिवडणुकीत मी जो ओबीसी आंदोलक आहे, त्यांच्यासाठी आवाज उठवणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मी काही गोष्टी आक्रमकपणे किंवा आक्रस्ताळपणे मांड्याचा प्रयत्न करत होतो. असे करत असताना मला वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आले. त्यानंतर मी थोडा विचार केला. माझी लढाई आहेच. स्वर्गीय दादांच्या बाबतीत सुद्धा मी त्यांना समोर ठेऊन प्रचंड आक्रमक भूमिकेतून प्रश्न मांडत होतो. सुनेत्रा ताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवले आमच्या अनेक मागण्या आहेत. 18 महामंडळ याच सरकारने निवडणुकीपूर्वी घोषित केली होती. मात्र अजूनही याला अध्यक्ष भेटला नाही. मला काही गोष्टी जाणवल्या अन त्यातून मी आक्रमक भूमिका मांडली. मला अनेक वरिष्ठ नेत्यांचा कॉल आला. पण जेव्हा मला सुनेत्रा ताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवले की नाही. एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तसेच माझ्या काही मागण्या नाहीत. मी जे प्रश्न मांडले आहेत मी त्यासाठी लढतच राहणार आहे. निवडणूक हा 10-15 दिवसांचा कालावधी आहे, नंतर आम्हाला आमचे प्रश्न मांडायला खूप दिवस आहेत. लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच अजित पवारांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. हाके सरांची लढाई सुरू राहिलच. पण मोठ्या मनाने त्यांनी माघार घेतली आहे. सुनेत्रा वहिनींसाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे.
