नांदेड (खास प्रतिनिधी) – वर्षाचा आश्विन महिना सुरू झाला की सर्वांनाच दिवाळीचे वेध लागतात. कौटुंबिक, व्यापारी, छोटे उद्योजक आणि शेतकरी यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सण. पण या सणाचे औचित्य साधून पत्रकारांची दिवाळी साजरी व्हावी या अत्यंत उदात्त आणि पवित्र हेतूने पोलीस विभाग खासकरून वाहतूक शाखा सर्वात जास्त तत्परता दाखवत आहे. तुळशीची माळ आणि मिठाईचे कलावंत वाहतूक शाखेत साक्षात भगवान बजरंगबली तैनात करण्यात आले आहेत आणि त्यांच्या सेवेला गळ्यात तुळशीची माळ घालून नामदेव महाराज हजर आहेत. इतकेच नाही, तर वेगवेगळ्या पॉईंट्सवर स्वतंत्र कलेक्टर देखील नेमण्यात आले आहेत. श्री गणरायांना मोदक प्रिय असतात, पण इथे दिवाळीत करंज्या, लाडू, बालूशाही, काजूकत्तली आणि जिलेबी या वेगवेगळ्या मिठायांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मिठाया बनवणारे अनेक कलाकार बाजारात आहेतच, पण त्या कलाकारांकडून मिठाई आपल्या डब्यात भरून घेण्याची ‘खास कला’ या मंडळींनी लीलया साध्य केली आहे. दुकानदारांना दंडाचा धाकआणि सुर्याची खास भूमिका मिठाई गोळा करण्याची ही व्यवस्था अगदी शिस्तबद्ध आहे. जर एखाद्या दुकानदाराने वाहतूक शाखेचे ऐकले नाही, तर त्याच्या दुकानासमोर उभ्या राहणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाते. वाहने ग्राहकांची असली तरी त्रास दुकानदारालाच होतो; त्यामुळे भीतीपोटी दुकानदार स्वतःहूनच दिवाळीच्या मिठाईची सोय करून देतात. ही मिठाई जमा करण्याच्या मोहिमेत, सध्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत असलेल्या आणि सुर्या हे उपनाव धारण केलेल्या पोलीस अंमलदाराची मुख्य भूमिका आहे. मागे सलग पाच वर्षे त्यांनी हेच काम अगदी कुशलतेने हाताळले आहे. अर्थात, केवळ वाहतूक शाखाच हे करते असे नाही, तर सर्वच जण या प्रवाहात सामील आहेत. विविध बीट अन् मोदकांचा अनुत्तरित साठा पूर्वी दिवाळी संपल्यावर कामगार वर्ग दुकानांमधून किंवा मोठ्या आस्थापनांमधून बक्षीस मागायचा. आता ती प्रथा थोडी मंदावली असली, तरी वाहतूक शाखेने ही परंपरा अगदी निष्ठेने सुरू ठेवली आहे. यासाठी काही अधिकारी व अंमलदारांची खास नोकरीच लावली गेली आहे. वाहतूक शाखेकडे वसुलीचे अनेक समृद्ध बीट उपलब्ध आहेत: वाळू वाहणाऱ्या गाड्या मोंढ्यात येणाऱ्या गाड्या व छोटे हत्ती तरोडा नाक्यावरून वाहतूक करणारे प्रवासी ऑटो सांगवीतून अर्धापूरकडे धावणारे प्रवासी ऑटो या प्रत्येक बीटमधून मिळणाऱ्या ‘मोदकांची’ संख्या तब्बल ४०० ते ५०० च्या घरात असल्याचे कळते. पण हा एवढा मोठा जमा झालेला मोदकांचा साठा नेमका जातो कुठे, हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरितच आहे! माळ गळ्यात, पण व्यवहार भलताच! दुसरीकडे, संत नामदेव मी गळ्यात तुळशीची माळ घातली आहे आणि सर्व काही सोडून दिले आहे असा प्रचार करतात. परंतु, प्रत्यक्षात या प्रचाराच्या अगदी विरुद्ध व्यवहार सुरू आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण जमावाजमव पत्रकारांसाठी करत असल्याचे सांगण्यात येते. पण यंदा संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असताना, पत्रकारांनी इतरांच्या किंवा पोलीस वसुलीच्या जीवावर दिवाळी साजरी न करता, आपल्या स्वतःच्या दमावर साजरी करणेच अधिक योग्य आणि सन्मानकारक ठरेल. Post Views: 276 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 10 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील १८ हजार १२४ मतांनी विजयी मुदखेडमध्ये तरुणाच्या खूनप्रकरणी १२ आरोपींना काही तासांत अटक!