विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात एकाच घरात तीन अविवाहित भावंडांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कुमार मेहता (50), दीपेश मेहता (52) आणि खेवणा मेहता (48) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही एकत्र राहत होते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता तिघांचे मृतदेह आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, आजारपण आणि आर्थिक अडचणींमुळे तणावाखाली असलेल्या या भावंडांनी विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी त्यांनी गुजराती भाषेत एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या परिस्थितीचा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने घटना उघडकीस विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील गार्डन अव्हेन्यू इमारतीच्या डी विंगमध्ये, 1203 क्रमांकाच्या सदनिकेत ही भावंडे राहत होती. गुरुवारी पहाटे त्यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे इमारतीतील रहिवाशांच्या लक्षात आले. यामुळे संशय निर्माण झाल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच बोळींज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी घरात तिन्ही भावंडांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासाला सुरुवात केली. आजारपण आणि आर्थिक अडचणींमुळे तणावात असल्याची माहिती पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही भावंडे अविवाहित होती. ते 2025 पासून या सदनिकेत भाड्याने राहत होते. त्यापैकी एका भावाला पक्षाघात झाला होता, तर दुसऱ्या भावाला कर्करोगाचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आजारपणावरील उपचार आणि आर्थिक विवंचना यांमुळे ते त्रस्त होते, असे मृत्यूपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओतून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या व्हिडिओमध्ये तिघांनी गुजराती भाषेत आपली परिस्थिती आणि टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारणांचा उल्लेख केल्याची माहिती आहे. मात्र, व्हिडिओतील संपूर्ण मजकूर आणि त्यातील दाव्यांची सत्यता तपासल्यानंतरच या प्रकरणातील परिस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे. 3 ते 4 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज घरात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बोळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही भावंडांनी 3 ते 4 दिवसांपूर्वी विष प्राशन केले असावे, अशी शक्यता आहे. मृत्यू नेमका कधी झाला आणि त्यामागील कारण काय, हे निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुरावे गोळा केले जात आहेत. घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने तपास केला. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. बहिणीशी संपर्क; आर्थिक मदतीची मागणी केल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मृत भावंडांच्या बहिणीशी संपर्क साधला. तिन्ही भावंडांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांनी आपल्याकडेही पैशांची मागणी केली होती, अशी माहिती बहिणीने पोलिसांना दिल्याचे समजते. या माहितीच्या आधारे पोलिसांकडून त्यांच्या आर्थिक परिस्थितीची आणि मृत्यूपूर्वीच्या घटनाक्रमाची चौकशी केली जात आहे. त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओचीही तपासणी केली जात असून, त्यातून मिळणाऱ्या माहितीची इतर पुराव्यांशी पडताळणी केली जाणार आहे. या प्रकरणात अन्य काही बाबी समोर येतात का, याचाही तपास सुरू आहे. एकाच इमारतीत वर्षभरात आत्महत्येच्या 3 घटना या घटनेमुळे गार्डन अव्हेन्यू इमारत पुन्हा चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षभरात या इमारतीत आत्महत्येच्या 3 घटना घडल्या आहेत. त्यापैकी 2 महिन्यांपूर्वी एका माजी लष्करी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यापूर्वी दहावीच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. एकाच इमारतीत वारंवार अशा घटना घडत असल्याने रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तीन भावंडांच्या मृत्यूमागील नेमके कारण, मृत्यूची वेळ आणि घटनाक्रम याबाबत शवविच्छेदन अहवाल तसेच पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्टता येणार आहे. हेही वाचा…. ‘मास्टरमाइंडला अटक कधी करणार?’:आदित्य ठाकरेंचा ठाण्यातून सवाल, मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यानंतरही न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाण्यातील एका प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित मास्टरमाइंडला अटक कधी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, संबंधित व्यक्तींना वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मीनाक्षी शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना, राजीनामा हा मुख्य मुद्दा नसून प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला आणि आरोपींना अटक कधी होणार, हे महत्त्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले. सविस्तर वाचा…. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 10 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?:नरेश म्हस्केंची मोठी घोषणा, अटकेसाठी सीबीआयला देणार निवेदन नसीरुद्दीन शाह ‘सरफरोश’मधील गुलफाम हसनची भूमिका प्रत्यक्षात उतरवत आहेत का?:‘त्या’ घोषणांना समर्थन आहे का? अमित साटम यांचा सवाल