दोन योजनांवर कोट्यवधी खर्चूनही वराडकरांची जुन्या टाकीवरच तहान:अर्धवट कामांमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर, 50 वर्षे जुन्या टाकीतून पुरवठा‎

[ads1]

शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवल्या तरीही धरणगाव तालुक्यातील वराड येथील ग्रामस्थांना आजही तब्बल ४५ ते ५० वर्षे जुन्या मोडकळीस आलेल्या पाण्याच्या टाकीवरूनच तहान भागवावी लागत आहे. नव्या योजनांचे काम निकृष्ट आ

.

गावात चार ते पाच दशकांपूर्वी बांधलेली जुनी पाण्याची टाकी चुना व सिमेंटच्या बांधकामातील आहे.

गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी यापूर्वी “भारत निर्माण योजना’ राबवण्यात आली. त्याअंतर्गत नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली खरी, परंतु या कामात प्रचंड गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या टाकीत पाणी भरल्यानंतर ती चक्क थरथरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परिणामी ही टाकी धूळखात पडून असून ती वापरातच आणली गेली नाही.

त्यानंतर केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी “जल जीवन मिशन’ अंतर्गत पुन्हा नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. यात नवीन टाकी, पाइपलाइन आणि विहिरीच्या कामाचा समावेश होता. मात्र, संबंधित ठेकेदार व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. दोन्ही योजनांवर शासकीय निधीचा अपव्यय झाला असला तरी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे.

ग्रामस्थ संतप्त, कारवाईची मागणी प्रशासनाने वराड येथील पाणीपुरवठ्याची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी, “भारत निर्माण’मधील निकृष्ट कामाची व “जल जीवन’च्या रखडलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि सुरक्षित पाणीपुरवठा तातडीने कार्यान्वित करावा, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *