[ads1]
![]()
सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून शासकीय कामात हस्तक्षेप केल्या्च्या आरोपावरून 35 गावकऱ्यांविरुध्द सोमवारी ता. 21 सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव तालु्क्यातील पार्डी पोहकर येथे रविवारी ता. 20 सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेतकरी महादेव पोहकर यांचा रोहित्रावर वायर जोडत असतांना अचानक विज पुरवठा सुरु झाल्याने होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले होते. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्या्च्या मागणीसाठी गावकऱ्यांचा मोठा जमाव एकत्र आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. तर विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर गावकऱ्यांचा रोष कमी झाला होता. दरम्यान, या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांनी सोमवारी ता. 21 सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये जमावाने जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केली असून शासकीय कामकाज करीत असतांना अटक केला तसेच शासकीय वाहना समोर येऊन वाहन अडवून कामात हस्तक्षेप केल्याचे तक्रारीत नमुद केले. या प्रकणी सेनगाव पोलिसांनी पांडूरंग पोहकर, अभिमान पोहकर, रवी पोहकर, त्र्यंबक पोहकर, जनार्धन पुरी, प्रभाकर पोहकर, समाधान पोहकर, राहुल मुडे, सुरजसिंग चव्हाण, किशन पोहकर, रामा पोहकर, अमोल पुरी, धारू पोहकर, माधव मुडे, दीपक पोहकर, राहुल पोहकर, विशाल पोहकर, अभिमान पोहकर, राजु पोहकर, गोपाल पोहकर यांच्यासह 35 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक सतीष वाघ, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. उपनिरीक्षक नागेश शेट्टीवार पुढील तपास करीत आहेत.
[ads2]
पार्डी पोहकर येथे शासकीय कामात अडथळा अन् जमावबंदीचे उल्लंघन:35 गावकऱ्यांवर सेनगाव पोलिसांत गुन्हा
















Leave a Reply