अजिंठा-अंधारी प्रकल्प मृत साठ्यात; सहा गावांवर पाणीटंचाईचे संकट:ग्रामस्थ चिंतेत, पावसाळा सरत आला, धरण मात्र कोरडेच; तालुक्यातील पिके गेली वाया‎

[ads1]

सिल्लोड तालुक्यातील शिवन्यासह मादणी अजिंठा, वाघेरा,आमसरी व अनाड या पाच गावांतील ५० हजारांहून अधिक नागरिकांची तहान भागवणारा अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्प सध्या मृत साठ्यात पोहोचला आहे. विशेष म्हणजे पावसाळा संपत आला तरी प्रकल्पात एक टिपूसही पाणी आले नसल्

.

१ टक्का जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी जलस्रोत आरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गतवर्षी परतीच्या पावसामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरला होता. मात्र यंदा शिवना मंडळात जोरदार पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. उन्हाळ्यातील प्रचंड बाष्पीभवन तसेच प्रकल्पातून झालेल्या पाण्याच्या बेसुमार उपशामुळे साठ्यात झपाट्याने घट झाली. आता उपलब्ध पाणीसाठा मृत साठ्यापेक्षाही कमी पातळीवर असल्याने महिनाभरानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. प्रकल्पात पाण्याची आवक न झाल्याने उपलब्ध साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. अजूनही पाऊस पडेल अशी आशा आहे,मात्र अखेरीसही पाऊस न झाल्यास आगामी महिनाभरानंतर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाई करावी व पिण्यासाठी पाणी आरक्षित करावे अशी मागणी विलास काळे यांनी केली आहे. प्रकल्प परिसरातील संपूर्ण रोहित्र बंद करण्यात आले असून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या असून पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी परिसरात पाहणी सुरू आहे. प्रीतम राठोड, कनिष्ठ अभियंता गेल्या दोन महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. आता सप्टेंबर महिना संपत आला तरी पावसाचा मागमुसही नाही. त्यामुळे नदी-नाले, तळे, तलाव, बंधारे कोरडेठाक आहे. पुढे पाणीटंचाई भीषण असणार आहे. मका, सोयाबीन, बाजरी, कपासी, ज्वारी पिके सुकली आहेत.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *