[ads1]
![]()
चांदूरबाजार पोलिसांनी कुरळपूर्णा येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका पिवळ्या रंगाच्या टिप्परवर कारवाई केली. या कारवाईत टिप्पर आणि रेती असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, कुरळपूर्णा येथील पूर्णा नदीपात्रातून एक पिवळ्या रंगाचा टिप्पर बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आसेगाव रोडवरील फुबगाव फाट्यावर सापळा रचला. पोलिसांनी MH 27 BX 7525 क्रमांकाचा टिप्पर पकडला. तपासणी केली असता, त्यात अंदाजे 1 ब्रास रेती आढळून आली. चालकाचे नाव अशफाक अहमद अब्दुल निसार (रा. थुगाव) असे आहे. त्याच्याकडे रेतीची रॉयल्टी विचारली असता, कोणतीही परवानगी नसल्याचे समोर आले. चालकाने हा टिप्पर भाड्याने घेतला असून, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रेतीची वाहतूक करत असल्याचे पोलिसांना सांगितले. या कारवाईत टिप्परची अंदाजे किंमत 5 लाख रुपये, तर रेतीची किंमत 8 हजार रुपये, असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक अशफाक अहमद अब्दुल निसार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूरबाजार पोलीस ठाण्याचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यात रवी बावणे, आशिष राऊत, जितेश सावरकर, सुहास पोटे आणि वैभव आकोटकर यांनी सहभाग घेतला.
[ads2]
कुरळपूर्णा नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक:टिप्परसह 5.08 लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकावर गुन्हा दाखल
















Leave a Reply