जरांगेंच्या उपोषणाचा 16वा दिवस:जरांगेंचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा, 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण; आजच्या पत्रकार परिषदेत देणार सविस्तर माहिती

[ads1]


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट आव्हान देत मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. “कोणत्याही परिस्थितीत उपोषण थांबणार नाही. १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून निघून १९ सप्टेंबरपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार,” असा एल्गार त्यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथील बैठकीत केला. विशेष म्हणजे, “आम्हाला जर वाटेत अडवले, तर सरकार पडले म्हणून समजा,” असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे. आज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची सविस्तर दिशा स्पष्ट करणार आहेत. सरकारला कारवाईसाठी अजूनही काही दिवसांची संधी सरकारला शेवटची संधी राज्य सरकारला कारवाईसाठी अजूनही काही दिवसांची संधी असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. “मुख्यमंत्री‌ देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत यावे किंवा आम्ही मुंबईला निघाल्यानंतर वाटेत कुठेही येऊन आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याचे सांगावे,” असे थेट आव्हान जरांगे यांनी दिले आहे. तसेच, आपल्या काही सहकाऱ्यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) नोटिसा बजावल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. हळदी-कुंकू लावून मागणार आरक्षण या आंदोलनादरम्यान मराठा समाजाने एक अनोखा आणि लक्षवेधी पवित्रा घेतला आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर मराठा समाजातील महिला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. तिथे त्यांना सौभाग्याचे लेणे असलेले हळदी-कुंकू लावून मराठा आरक्षणाची मागणी केली जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मुंबईला जाण्याचा 5 दिवसांचा मार्ग कायदेशीररित्या मुंबईच्या वेशीवर तटबंदी करणार!: सदावर्तेंचा इशारा मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. जरांगेंची मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागून मुंबईत येणार नाही असे जाहीर करावे, अशी थेट मागणी सदावर्ते यांनी केली आहे. ‘दोन जन्म घेतले तरी मागणी मान्य होणार नाही’ मनोज जरांगे यांच्या उपोषणावर आणि त्यांच्या मागण्यांवर कडाडून टीका करताना सदावर्ते म्हणाले की, “मनोज जरांगे यांचे दोन जन्म जरी झाले, तरीसुद्धा त्यांची ही मागणी कुणीच मान्य करू शकत नाही. जरांगेंच्या मागण्या पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी या आंदोलनावर ताशेरे ओढले आहेत. सविस्तर वाचा ————- ही बातमी पण वाचा.. जरांगेंच्या भाषेचे समर्थन करत संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र मनोज जरांगे पाटील यांच्या ‘मुंबई चलो’ आंदोलनावर बोलताना राऊतांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. “जरांगे शिवराळ भाषा वापरतात म्हणून त्यांच्याशी चर्चा होत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. पण पुण्यात विद्यानंद बापट हे अत्यंत सभ्य आणि संस्कारी भाषेत आंदोलन करतात. मग त्यांच्यावर सरकार पुरस्कृत गुंडांनी हल्ला का केला?” असा सवाल राऊत यांनी विचारला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीचा संदर्भ देत, “ज्याला जी भाषा कळते तीच वापरावी, जर सरकारला शिवीची भाषा कळत असेल, तर तीच भाषा वापरायला पाहिजे,” असे म्हणत त्यांनी जरांगेंच्या भाषेचे समर्थन केले. सविस्तर वाचा

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *