हल्ला, प्रतिहल्ला आणि रुग्णालयात खून — शहर हादरवणाऱ्या प्रकरणात सहा जणांना कोठडी 

0
WhatsApp-Image-2026-04-05-at-17.07.50.jpeg


नांदेड (प्रतिनिधी)- परवा रात्री ई-स्क्वेअर परिसरात घडलेल्या तिहेरी खून प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेशी संबंधित दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 8 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरिजीत सिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या हल्ल्यात अरिजीत सिंग चव्हाण यांचा मृत्यू झाला. झालेल्या प्रतिकारादरम्यान विरोधी गटातील सय्यद आवेज सय्यद खलील मरण पावला आणि मोहमद अरबाज जखमी झाला.

दरम्यान, जखमी मोहम्मद अरबाज याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथे नेत असताना अरिजीत सिंगचा भाऊ प्रदीप गजानन चव्हाण याने रुग्णालयातच चाकूने हल्ला करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.या घटनेप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून अरिजीत सिंग चव्हाण यांच्या आई अनिता गजानन चव्हाण या तक्रारदार आहेत.

पहिल्या गुन्ह्यात साईलाला, शाहरुख खान उर्फ कबुतर, मोहम्मद अरबाज व सय्यद अवेज यांच्या सह इतर गॅंग सदस्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात साबीर खान बशीर खान व सोनू कैलास राऊत यांना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात सय्यद खलील सय्यद इब्राहिम यांच्या तक्रारीवरून गॅंग सदस्यांसह  गजानन बालसिंग चव्हाण (वय 50), प्रदीप गजानन चव्हाण (वय 25), अनंतराव शिरसागर उर्फ लाट्या (वय 25) व उत्तमराव लढे (वय 26) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक महेश माळी, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे व त्यांच्या पथकाने कारवाई करून आरोपींना अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

चव्हाण कुटुंबियांच्या वतीने ऍड.सरबजीतसिंघ शाहू यांनी बाजू मांडली. सरकारी व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सहा आरोपींना 8 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील साईलाला व शाहरुख उर्फ कबूतर यांच्या सह इतर गॅंग सदस्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

संबंधित बातमी ….

भाईगिरीच्या नादात तीन तरुणांचा अंत; एका रात्रीत तीन घरांचे दिवे विझले  


Post Views: 1,365






About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

WordPress Studio Krowd – Crowdfunding Projects & Charity Template Kit Krowd – Crowdfunding Projects & Charity Template Kit Kørsel – Car Repair & Auto Wash WordPress Theme Kube – Music Elementor Template Kit Kubuu – Real Estate Elementor Template Kit Kubuu – Real Estate Elementor Template Kit Kudo – Portfolio, Marketing Landing Page WordPress Theme Kuist – Photography Series Portfolio WordPress Theme Kulit – Skin Care & Dermatology Elementor Template kit Kulluu – Creative Agency WordPress Theme
Enable Notifications OK No thanks