पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील वेळू येथील एका रिसॉर्टवर सुरू असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा राजगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकत 13 मुलींची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या या तरुणी मुंबई, पुण्यासह दिल्ली, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वेळू येथील ‘आमराई’ रिसॉर्टवर ही धडक कारवाई करण्यात आली. रिसॉर्टवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बनावट गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी हा छापा टाकला. याप्रकरणी वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांवर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. पैशांचे आमिष आणि हजार रुपयांत व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासून आमराई रिसॉर्टमध्ये हा बेकायदेशीर प्रकार सुरू होता. आरोपी शेट्टी हा या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होता. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या एक हजार रुपयांमध्ये या महिलांकडून हा व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे छाप्यादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले. सुटका करण्यात आलेल्या तरुणी देशातील वेगवेगळ्या राज्यांतील असल्याने या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे. रिसॉर्ट राजकीय पदाधिकाऱ्याचे असल्याची चर्चा या कारवाईनंतर संबंधित रिसॉर्टच्या मालकी आणि व्यवस्थापनाबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. हे रिसॉर्ट एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने हे रिसॉर्ट दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिसांना विचारले असता, रिसॉर्ट नेमके कोणाच्या मालकीचे आहे, याचा समांतर तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कचा तपास या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रिसॉर्टमधील आर्थिक व्यवहार आणि या तरुणींना येथे आणण्यामागील संपूर्ण यंत्रणेचा तपास सुरू केला आहे. सुटका करण्यात आलेल्या 13 तरुणींना या व्यवसायात कसे ओढले गेले, त्यांना पैशांचे आमिष कसे दाखवण्यात आले आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल शोध पोलिस घेत आहेत. तसेच, हा प्रकार सुरू असताना रिसॉर्ट व्यवस्थापनाची यात नेमकी काय भूमिका होती, याचीही कसून चौकशी केली जात आहे. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू सध्या या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. रिसॉर्ट मालकीबाबत राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव चर्चेत असले तरी अद्याप त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून रिसॉर्टचा मालक, व्यवस्थापन आणि इतर संभाव्य आरोपींची माहिती लवकरच निष्पन्न होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 5 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation ग्रामीण पोलिसांनी 40 टन संशयास्पद सुपारी जप्त केली:नवकर वेअरहाऊसवर छापा, चार वाहने ताब्यात; चार वर्षांत 11.50 कोटींचा माल पकडला