पडद्यामागची सत्य परिस्थिती जनतेसमोर आल्यास सरकारची प्रतिमा मलिन होईल, या भीतीपोटी ही ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे, असे सांगत जर त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला नाही, तर हा कट त्यांनीच घडवून आणला होता, असा संदेश महाराष्ट्रातील जनतेमध्ये जाईल, असा गंभीर इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ते या ऑडिओ क्लिपचा खरा तपास नक्की करतील. मात्र, ही क्लिप खोटी असल्याचे भासवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे माझ्या कानावर आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ही क्लिप खरी असेल, तर नेमके ते पैसे कुठून आणले? ते शिंदेंना का दिले नाहीत? ते कशासाठी आणले होते? आणि देवेंद्र फडणवीस यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न होता का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील. ही क्लिप खरी असल्याचे लपवण्यासाठी आणि विरोधकांना बदनाम करण्यासाठी ती खोटी असल्याचे भासवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजासाठी लढा सुरूच राहणार मनोज जरांगे पाटील म्हणाले की, समाजाशी कधीही विश्वासघात करायचा नाही आणि समाजासाठीच आपला जीव द्यायचा, या निश्चयाने मी लढत आहे. मी सर्व सत्य बाजू समाजासमोर मांडत असून, मी मागे हटणार नाही. परंतु, आपणच निवडून दिलेले सरकार कधीकधी किती त्रास देते, हे सहन होत नाही. खऱ्या माणसांना पावला-पावलावर त्रास दिला जात असून, सरकारकडून जीव घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशा यातना मला सहन कराव्या लागत आहेत. हे ही वृत्त वाचा सुनेत्रा पवारांना अर्थखाते देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक:हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल काही चर्चा नाही- छगन भुजबळ महायुती सरकारमध्ये अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. मात्र, दुष्काळ निधीचे वाटप आणि इतर तांत्रिक बाबींमुळे या निर्णयाला काहीसा वेळ लागत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 3 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation मुंढवाप्रकरणी सुनेत्रा पवारांच्या 2 पीएंना नोटीस:राष्ट्रवादी काँग्रेसची देवगिरीवर खलबतं; उपमुख्यमंत्री पवारांसह नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर