एकनाथ शिंदेंचे नेतृत्व कमकुवत होणार नाही:अंजली दमानियांना कागदपत्रे पुरवणारा अज्ञात व्यक्ती कोण? शोधा – मंत्री उदय सामंत
![]()
अंजली दमानिया यांच्याकडे जर अशोक खरात प्रकरणी सीडीआर पोहोचला असता तर त्यांची पूर्ण कॉपी आली असती. एका हॉटेलच्या लेटर हेडवर काही गोष्टी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा काल स्पष्ट केले की अज्ञात व्यक्तीने हे दिले आहे. अशा आरोपाने काही एकनाथ शिंदेंचे नेतृत्व कमकूवत होणार नाही. उलट जनतेला एकनाथ शिंदेंना जे ते भावतात ती जनतेमध्ये वाढत जाणार आहे. त्या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. उदय सामंत म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसाठी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी हीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. काँग्रेस कसे पुढे जाते आणि कसे मागे पडते यावर संजय राऊतांनी वक्तव्य केले आहे, त्यावर मी जास्त काही बोलणार नाही. साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीवेळी काय झाले यावर कार्यकर्त्यांशी चर्चा केली, प्रत्येक गोष्ट माध्यमांसमोर सांगायची नसते.येणाऱ्या निवडणुकीत जनतेची भावना काय हे समजेल. एकनाथ शिंदे NDA मधील तिसऱ्या क्रमांकाचे नेते उदय सामंत म्हणाले की, अंजली दमानियांना हे कागदपत्रे कोणी दिले, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे त्यातून या सर्व गोष्टी पुढे येतील. एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलण्यापेक्षा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तो कागद पुरवठा करणारा कोण यावर चौकशी झाली पाहिजे. खरात प्रकरणी कोण कोणाला भेटले हे सर्व जनतेला माहिती आहे. एकनाथ शिंदे हे एनडीएमधील 3 नंबरचे नेते आहेत. त्यांचे काम निवडणुकीतून दिसून आले. अजितदादांनी अनेक वर्षे काँग्रेसचे नेतृत्व केले उदय सामंत म्हणाले की, अजित पवार यांनी अनेक वर्षे काँग्रेससुद्धा काम केले होते. राजकारणापेक्षा अजित पवार आपल्यात नाही आणि सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवत असतील तर ती बिनविरोध करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तीच भूमिका शिवसेनेची आहे, आम्ही सुद्धा सर्वांना विनंती करतो की राजकारण करण्यापेक्षा आपले राजकीय संस्कार पुढे नेले पाहिजे. यातून महाराष्ट्र राजकीय संस्कार असलेले राज्य आहे असे संदेश देशभरात जाईल. म्हणून शरद पवारांची भेट घेतली उदय सामंत म्हणाले की, ओपस स्पेसमध्ये कशापद्धतीने वृक्षारोपन करता येईल त्यासंदर्भात आमची चर्चा झाली. नाट्य परिषदचे प्रमुख विश्वस्त शरद पवार आहेत त्यांच्याशी परिषदेच्या कामासंदर्भात आम्ही आज शरद पवारांची भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांची भेट झाली नव्हती त्यांची प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी अनेक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे, त्यांचे मार्गदर्शन लाभणं फार महत्त्वाचे आहे.
