Matunga Railway Workshop AC Coach Fire; Mumbai Train Services Normal
![]()
मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील डबा दुरुस्ती कारखान्यात (Workshop) मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. दुरुस्तीसाठी उभा असलेल्या एका एलएचबी (LHB) स्लीपर कोचला ही आग लागली असून, यामध्ये डब्याचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले आ
.
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी ३:१० वाजेच्या सुमारास वर्कशॉपमधील एका स्लीपर कोचमध्ये डागडुजीचे काम सुरू होते. या कोचच्या सीएसएमटीच्या दिशेकडील टोकाला असलेल्या स्वच्छतागृहाजवळ (टॉयलेट) वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक एक ठिणगी उडाली आणि आगीचा भडका उडाला. त्याच वेळी सुटलेल्या वेगवान वाऱ्यामुळे ही आग संपूर्ण डब्यात वेगाने पसरली. आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट माटुंगा स्थानकावरून दिसत असल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
डब्याचे मोठे नुकसान
या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, रेल्वेच्या अत्याधुनिक एलएचबी कोचचे ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. आगीमुळे कोचची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून तो जवळपास निकामी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता आणि वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले होते.
रेल्वे वाहतूक सुरळीत
ही दुर्घटना वर्कशॉपच्या अंतर्गत भागात घडल्यामुळे मुख्य रेल्वे मार्गावरील लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मध्य रेल्वेची वाहतूक आपल्या निर्धारित वेळेनुसार सुरू होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
काही दिवसांपूर्वीच कुर्ला यार्डात लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच, आता माटुंगा वर्कशॉपमध्ये ही दुर्घटना घडल्याने रेल्वेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुरुस्तीचे काम सुरू असताना आवश्यक ती खबरदारी घेतली गेली होती का, असा सवाल आता विचारला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून या आगीच्या कारणांची सखोल चौकशी केली जाणार आहे.
हे ही वाचा…
समृद्धी महामार्गावर टँकरमधून गॅस गळती:जालना एक्झिटच्या पुढे वाहनांची 25 KM लांब रांग; हजारो वाहने अडकली, प्रवाशांचा संताप
गतिमान प्रवासासाठी हाती घेण्यात आलेला समृद्धी महामार्ग आता प्रवाशांसाठी चांगलाच अडचणीचा ठरू लागला आहे. मंगळवारी तारीख 7 तब्बल 25 किलोमीटरचा जाम लागल्यामुळे हजारो वाहने अडकून पडली आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना महामार्ग पोलिसांकडून मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले जात आहे. सविस्तर वाचा…
