संजय राऊत स्वतःलाच 'प्रतिपक्ष प्रमुख' मानतात:मविआमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा, काँग्रेसने उबाठाला फाट्यावर मारले, नवनाथ बन यांचे राऊतांना प्रत्युत्तर

0
new-project-2026-04-05t114637058_1775369787.jpg




बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. संजय राऊतांना तसे वाटत नाही ते स्वत:ला उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे समजत आहेत. राऊतांना वाटते की तेच ‘प्रतिपक्ष प्रमुख’ समजतात, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीत उबाठाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा असे राऊतांना वाटते, तर उद्धव ठाकरेंना सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवड व्हावी. त्या दृष्टीने त्यांचा आणि सुनेत्रा पवार यांचा संवाद सुद्धा झाला आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत स्वत:ला उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे समजत असल्याने त्यांची काँग्रेसला पाठिंबा देण्याची इच्छा आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीवरुन उबाठामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत उभे राहिल्याचे दिसून येत आहे. आता या वादात कोण जिंकणार हे पाहणं महत्तवाचे ठरणार आहे. राज्यसभेच्या जागेसाठी राऊत काँग्रेसच्या बाजूने बोलत आहेत. मविआमध्ये बिघाडी नवनाथ बन म्हणाले की, विधान सभेच्या निवडणुकीवरुन मविआमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा हे बघायला मिळत आहे. संजय राऊत काहीही दावा करत असले की मविा एकत्र आहे तर असे काहीही नाही. मविआत उद्धव ठाकरेंची वेगळी भूमिका आहे, शरद पवार गटाची वेगळी भूमिका आहे, तर काँग्रेस म्हणतंय की आम्ही दोन्ही निवडणुका लढवू ते सुद्धा तुम्हाला न विचारता हर्षवर्धन सपकाळ घोषणा करतात. काँग्रेसने तुम्हाला फाट्यावर मारले आहे. तुमचे तिघांचे तोंड वेगवेगळ्या दिशेला आहे. तुमची विधानसभेनंतर एकही बैठक झालेली नाही, जनतेने मविआला ओळखले आहे. जैन मुनींच्या बोलण्याचे समर्थन नाहीच नवनाथ बन म्हणाले की, छत्रपती शावाजी महाराज यांच्यासाखा राजा पुन्हा होणे नाही. जैन मुनी यांनी केलेल्या वक्तव्याचे कुणीही समर्थन करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही करू नये हे नीतेश राणे यांनी सुद्धा सांगितले आहे. तरीही संजय राऊत टीका करत आहेत. राऊत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागितले त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर बोलण्याचा अधिकारच गमावला आहे. तुम्ही आधी त्या विषयी माफी मागा आणि मगच दुसऱ्या विषयावर बोला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

WordPress Studio Easy Digital Downloads Gravity Forms Checkout Easy Digital Downloads Invoices Addon Easy Digital Downloads License Free Download Easy Digital Downloads MailChimp Easy Digital Downloads MailPoet Easy Digital Downloads Manual Purchases Easy Digital Downloads MaxMind Fraud Prevention Addon Easy Digital Downloads Message Easy Digital Downloads PayPal Adaptive Payments Easy Digital Downloads PayPal Pro and PayPal Express
Enable Notifications OK No thanks