अमरावती जिल्ह्यात आज, रविवार २५ ऑक्टोबर रोजी असाक्षर नागरिकांची परीक्षा घेतली जात आहे. शासनाच्या ‘उल्लास ॲप’वर १४ हजार १८६ असाक्षर नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कोणत्याही तीन तासांसाठी नियोजित केंद्रावर जाऊन ही परीक्षा देता येईल. पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेतली जात असून, जिल्ह्यात यासाठी १४३५ केंद्र उघडली आहेत. नोंदणी केलेल्यांमध्ये ११ हजार ४३९ महिला, २ हजार ७४२ पुरुष आणि दोन तृतीयपंथी आहेत. सर्वाधिक परीक्षार्थी धारणी तालुक्यात (२,३९०) तर सर्वात कमी अमरावती मनपा क्षेत्रातून (६७१) आहेत. ही परीक्षा मराठी, हिंदी आणि उर्दू अशा तीन भाषांमधून होईल. परीक्षार्थींना १५ पानांचा पेपर मिळेल, ज्यात प्रश्न आणि उत्तरपत्रिका एकत्र असतील. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search