स्टेफनी चोरीच्या कारणावरून खून; दोघांना अटक – VastavNEWSLive.com

0
ChatGPT-Image-Jun-11-2026-02_59_07-PM.jpg


नांदेड(प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यातील नवा मोदा येथे स्टेफनी (गाडीचे अतिरिक्त चाक) चोरीच्या कारणावरून ४२ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० जून २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मयत ज्ञानोबा नारायण घुरके (वय ४२, रा. खैरका, ता. मुखेड) याला आरोपी गजानन माणिकराव सदगिर व आप्पाराव बालाजी सुर्यवंशी (दोघे रा. खैरका) यांनी संगनमताने गाडीची स्टेफनी चोरीच्या कारणावरून वाहन क्रमांक एमएच-२४ एबी-७४३५ मध्ये नेऊन खून केला. फिर्यादी शशिकला यादव देवकते (वय ४०, रा. तारदरवाडी, ता. मुखेड) यांच्या तक्रारीवरून मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६७/२०२६ नोंदविण्यात आला. यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), १४० व ३(५) लागू करण्यात आले आहेत. आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली असून पोउपनि माने (मो. ७७०९३१६९०९) तपास करीत आहेत. अधिक तपास सुरू आहे.


Post Views: 73






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed