शहाजी उमाप पथकाने लातूर जिल्ह्यात पकडला गुटखा साठा; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त


लातूर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने छापा टाकून सुमारे ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीरकडे गुटखा वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३० मार्च २०२६ रोजी उदगीर-अहमदपूर रोडवरील वाढवणा पाटीजवळ संशयित महिंद्रा बोलेरो वाहन अडवण्यात आले.

तपासणीदरम्यान वाहनातून अवैधरित्या विक्रीसाठी नेण्यात येत असलेला २ लाख ४९ हजार ६०० रुपयांचा गुटखा आढळून आला. वाहनासह एकूण ८,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी

  • रसूल इब्राहिम शेख (वय ४१, रा. भाग्यनगर, ता. अहमदपूर)
  • राजू गुरुलिंग हामणे (रा. भाग्यनगर, ता. अहमदपूर)

यांच्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाढवणा येथील सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव गायकवाड हे करीत आहेत.

 गुटखा व तंबाखूविरोधी कठोर कारवाई

पोलीस प्रशासनाकडून गुटखा, पान मसाला, मावा, सुगंधित सुपारी व तत्सम पदार्थांची साठवण, वितरण आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यास दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.

 ‘खबर’ हेल्पलाइन सुरू

अवैध व्यवसायांविषयी माहिती देण्यासाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाइन (9150100100) सुरू केली असून नागरिकांनी फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप नी केले आहे.हि कामगिरी पोलीस उप निरीक्षक पंकज इंगळे,पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,संजीव जिंकलवाड,गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी केली. 


Post Views: 150






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks