दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराआंस) आणि शेतकरी संघटनेने गुरुवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन केले. जमा झालेले ८६० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी इंदिरा चौधरींना दिले. मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शेतकऱ्यांनी एकरी ५० हजार रुपयांचे अनुदान आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. कमी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला. दुष्काळामुळे अमरावती विभाग आणि वर्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच पोलिसांनी गेट बंद केले, ज्यामुळे शाब्दिक चकमक झाली. आंदोलकांनी ठिय्या देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी सहभागी होते. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 11 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation 500 कोटींच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचा पलटवार:ग्रुप कॉलची फॉरेन्सिक तपासणी करा, एकनाथ शिंदेंवरील आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होईल ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक:‘SIR रद्द करा’च्या घोषणांनी परिसर दणाणला, आंदोलकांची धरपकड