तुम मेरे हो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. त्यात प्रेम, फसवणूक, लग्न आणि नात्यांमधील चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. गुरमीत चौधरी आणि ईशा मालवीय ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहे. चित्रपटाची कथा अशा नात्याभोवती फिरते, जे मजबुरीने सुरू होते. मात्र हळूहळू प्रेमात बदलते. पण प्रश्न असा आहे की, ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरेल का? चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा आकाश (गुरमीत चौधरी) आणि तमन्ना (ईशा मालवीय) यांच्याभोवती फिरते. थायलंडमध्ये राहणारा आकाश आपली प्रेयसी निशाच्या (अनुष्का लुहार) फसवणुकीनंतर भारतात परततो. येथे त्याची भेट तमन्नाशी होते. आपल्या प्रियकर साहिलपासून (शान आर ग्रोवर) दुरावल्यामुळे तमन्ना त्रस्त असते. आजीची मालमत्ता मिळवण्यासाठी तमन्नाला एक वर्ष लग्न टिकवून ठेवावे लागते. अशा परिस्थितीत आकाश आणि तमन्ना लग्न करतात. सुरुवातीला हे नाते केवळ मजबुरीपोटी असते; मात्र हळूहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागते. कथेत जुन्या नात्यांची आणि सूडाची एंट्री झाल्याने रोमँसमध्ये नवे वळण येते. चित्रपटातील अभिनय
गुरमीत चौधरी आपल्या भूमिकेत सहज वावरताना दिसतात. त्यांचा रोमँटिक अंदाज ठीक आहे, मात्र काही भावनिक दृश्यांमध्ये आणखी खोलीची गरज जाणवते. ईशा मालवीय पडद्यावर ताज्या आणि आकर्षक दिसतात. गुरमीतसोबतची त्यांची केमिस्ट्री चांगली आहे आणि हीच चित्रपटाच्या मोठ्या जमेच्या बाजूंपैकी एक आहे. सहाय्यक कलाकारांनीही कथा पुढे नेण्यात मदत केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन
आशीष पांडा यांनी रोमान्स, कौटुंबिक नाट्य आणि नात्यांमधील चढ-उतार यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नाचे काही प्रसंग मजेदार आहेत आणि थायलंडमधील लोकेशन्स चित्रपटाला सुंदर बनवतात. मात्र, कथा अनेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे पुढे जाते. काही ट्विस्ट सहज लक्षात येतात आणि पटकथेचा वेगही अधूनमधून मंदावतो. एडिटिंग थोडे अधिक चपळ असते, तर चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता. चित्रपटातील संगीत
चित्रपटातील गाणी रोमँटिक वातावरण निर्माण करण्यास मदत करतात. टायटल ट्रॅक आणि ‘विंटर आयूं वालीए 2.0’ यांसारखी गाणी लक्ष वेधून घेतात. मात्र, काही ठिकाणी संगीत कथानकाचा वेग मंदावते. चित्रपटाबाबत अंतिम मत
‘तुम मेरे हो’ हा एक हलकाफुलका रोमँटिक चित्रपट आहे, ज्यात प्रेम, फसवणूक आणि नात्यांमधील ट्विस्ट आहेत. गुरमीत आणि ईशाची केमिस्ट्री चित्रपट पाहण्यासारखा बनवते, पण अंदाज लावता येणारी कथा आणि कमकुवत पटकथा त्याचा प्रभाव कमी करतात. तुम्हाला रोमँटिक ड्रामा आवडत असेल, तर हा चित्रपट एकदा पाहता येईल.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search