कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन. – VastavNEWSLive.com

0
WhatsApp-Image-2026-03-28-at-11.58.33.jpeg


वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे.ते संबंध महाराष्ट्रावर कविरत्न रंजन इंगोले या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अंत्यविधी बौद्ध समशानभूमी वसमत येथे दिनांक २६/०३/ २०२६ ठीक पाच वाजता करण्यात आला. यावेळी अंत्ययात्रेत रिपाइं (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे, रिपाइं परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, शाहीर आनंद किर्तने, प्रा. सुभाष मस्के, भिम टायगर सेनेचे विजय एंगडे, भास्कर गवळे यांच्यासह आदींनी यावेळी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी रामचंद्र घोडके, उत्तम वाव्हेळे, दिलीप ठेंबरे, गौतम मोगले, सुभाष खेबाळे, डॉ. भुरे, प्रतिक सोनवणे, राहुल कसबे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची, नागरिक, महिलांची अंत्ययात्रेत सामील झाले होते.


Post Views: 11






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed