नांदेड (प्रतिनिधी) – पत्रकाराला धमकावून मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 ते 9.45 वाजण्याच्या दरम्यान घडली.
तक्रारदार रामदास उर्फ मनोज माणिकराव मंगनुळे (वय 39, व्यवसाय – पत्रकार, रा. आंबेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, संबंधित पत्रकाराने एका वृत्तपत्रात अवैध धंद्यांबाबत बातमी प्रकाशित केली होती. या बातमीच्या पार्श्वभूमीवर काही जणांनी संताप व्यक्त करत पत्रकाराला फोनवरून व प्रत्यक्ष भेटून धमक्या दिल्या.
घटनेच्या दिवशी आरोपींनी तक्रारदारास अडवून त्याच्याशी वाद घालत “गावातील बातम्या का छापतोस?” असा जाब विचारला. तसेच त्याला शिवीगाळ करून मारहाणीचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी आरोपींकडे मोटारसायकली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 137(2), 62, 115(2), 351(2), 351(3), 189(2) तसेच पत्रकार परिषद अधिनियम अंतर्गत कलम 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
Post Views: 86
