‘झीरो कॉस्ट’ मॉडेल:नागपूर मेट्रोचा जागतिक विक्रम! रुळांवर वीजनिर्मिती; वर्षाकाठी 2,900 हून अधिक झाडे लावण्याइतका पर्यावरणाला फायदा

0
orig_730-x-548-new-2026-05-11t062528970_1778460977.jpg




नागपूरने पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. नागपूर मेट्रो (महा मेट्रो) आता प्रवासी वाहतूक यंत्रणेसह चक्क एक ‘फिरते पॉवर हाऊस’ बनली आहे. रुळांच्या मधल्या जागेचा आणि पिलर्सचा कल्पकतेने वापर करून सौर ऊर्जा निर्मिती करणारी ही महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील अत्यंत नावीन्यपूर्ण मेट्रो ठरली असल्याची माहिती वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट संचार) अखिलेश हळवे यांनी दिली आहे. इतर मेट्रोच्या तुलनेत नागपूरचे मॉडेल वेगळे कसे? भारतात सौरऊर्जेचा वापर दिल्लीसह इतर मेट्रोमध्येही केला जातो, परंतु नागपूर मेट्रोने तंत्रज्ञानाची नवी उंची गाठली आहे. दिल्ली मेट्रो: दिल्ली मेट्रोने स्थानकांच्या छतावर आणि डेपोमध्ये सौर पॅनल लावले आहेत, मात्र ट्रॅकच्या मधल्या जागेचा वापर करून वीजनिर्मिती करण्यात नागपूरने बाजी मारली आहे. महाराष्ट्रात प्रथमच: नागपूरने ही प्रणाली यशस्वी करून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. आता पुणे मेट्रोमध्येही अशाच प्रकारचे पॅनल बसवण्याचे नियोजन सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed