जलसंपदा विभागामार्फत केदारनाथ साठवण तलावावरील चार्‍या, कालव्याची दुरुस्ती, सिमेंट काँक्रिटीकरण करा

जलसंपदामंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भागवत देवसरकर यांची मागणी

प्रतिनिधी दि. 27 –

जलसंपदा विभागामार्फत हदगाव तालुक्यातील केदारनाथ साठवन तलावावरील सर्व कालवे, चार्‍या दुरुस्ती करून सिमेंट काँक्रिटकरण करण्यासाठी संबंधित विभागाकडून सविस्तर प्रस्ताव मागून प्रशासकीय मान्यता देत, निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे जलसंपदामंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

केदारनाथ येथे मध्यम प्रकारातील साठवण तलाव आहेत, तलावाच्या माध्यमातून तळेगाव, डोरली, वडगाव, पाथरड, कोळगाव व कंजारा या गावात शेतकर्‍यांना रब्बी हंगामाकरता सिंचनासाठी पाणी मिळत असते,परंतु मागील 25 वर्षापासून कालव्याची कामे न झाल्यामुळे व सर्व कालवे माती कामाचीच असल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होऊन शेतक-यांना पिकाच्या सिंचनासाठी अपुरे पाणी मिळत आहे,शेवटच्या गावात शेतकर्‍यांना आपल्या पिकासाठी पाणी मिळण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत, त्यामुळे नांदेड येथील जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकान्यांना तात्काळ आदेश देऊन केदारनाथ तलावावरील कालव्याच्या दुरुस्ती व सिमेंट कॉक्रिटीकरणकरिता विशेष निधी उपलब्ध करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश द्यावेत व सदर कामांकरिता निधी व प्रशासकीय

मान्यता द्यावी ही विनंती राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भागवत देवसरकर यांनी केली असता तात्काळ दखल घेत निवेदनावर शेरा मारत कार्यकारी संचालक,गोदावरी खोरे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांना तपासून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे, यामुळे या भागातील शेतकर्‍यांच्या सिंचनाची सोय होणार असून यासाठी कार्यकारी अभियंता,जलसंपदा विभाग यांच्याकडून सविस्तर प्रस्ताव तयार करून निधी व प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे भागवत देवसरकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *