भोकरमध्ये गौण खनिजांच्या अवैध उत्खननावर पोलिसांची कारवाई; 55.03 लाखांचा मुद्देमाल जप्त


 

भोकर (प्रतिनिधी) : भोकर पोलिसांनी गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत सुमारे 55 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 24 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भोकर हद्दीत अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी एका जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन करून ती ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

या कारवाईत एक JCB मशीन (किंमत सुमारे 35 लाख रुपये), एक ट्रॅक्टर-ट्रॉली (किंमत 20 लाख रुपये) आणि अंदाजे 35 हजार रुपयांची वाळू असा एकूण 55,03,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी मालक, चालक तसेच ट्रॅक्टर चालक अशा चार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post Views: 79






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *