रुपेश पाडमुख यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-मागील पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून वृत्तपत्र क्षेत्रासह विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे दै. समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख यांना पुणे येथील स्वप्नल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार जाहीर झाला असून दि. 23 मार्च 2026 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले स्मारक सांस्कृतिक केंद्र, पुणे महानगरपालिका, गंज पेठ, पुणे येथे पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा दै. समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख मागील पंचवीस वर्षापेक्षा अधीक काळापासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत. मागील वीस वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रातील प्रत्येक घटकांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उपेक्षित महिलांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याचे काम त्यांच्या हातून होत आहे. वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा व इतर प्रत्येक क्षेत्रातील वंचितांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान सातत्याने करत आहेत. एवढेच नव्हे तर शहिद झालेल्या जवानांच्या परिवारासह देशांतर्ंगत सेवा देणार्‍या पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचार्‍यांचा दरवर्षी गौरव करुन कृतज्ञता व्यक्त करण्याचे सामाजिक दायीत्व निभावत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन स्वप्नल फाऊंडेशन पुणेच्या अध्यक्षा शोभाताई बल्लाळ, रवी सावंत व त्यांच्या टीमने पाडमुख यांना आदर्श संपादक हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. सदरील पुरस्काराबद्दल विविध मान्यवरांकडून अभिंनदन होत आहे.

Post Views: 108






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *