ऑगस्ट 2024 मध्ये सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने ऑगस्ट 2024 या महिन्यातील सीसीटीएनएसच्या कामगिरीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून राज्यातील पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीबाबतचा आढावा प्रत्येक महिन्यात घेतला जातो.ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या या आढाव्यात नांदेड जिल्हा पोलीस दलाने राज्यात गुणानुक्रमे दुसरा क्रमांक पटकावला आहे. सीसीटीएनएस प्रणालीमध्ये वेगवेगळ्या 18 प्रकारच्या कामांची माहिती नियमित भरायची असते. त्यात घटनास्थळ पंचनामे, अनोळखी मयत, अदखलपात्र खबर, मालमत्ता जप्ती अशा त्या नोंदी होतात. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याने 201 गुणांपैकी 196 गुण प्राप्त करून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात सीसीटीएनएस नोडल अधिकारी अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.के.ए.धरणे यांच्या सोबतच पोलीस उपनिरिक्षक सय्यद अनिसा फातेमा, पोलीस अंमलदार समीर खान मुनीर खान पठाण, माधव नारायण येईलवार यांच्या परिश्रमाने हा द्वितीय क्रमांक नांदेड जिल्ह्याने मिळवला आहे. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सीसीटीएनएस विभागाचे कौतुक केले आहे आणि भविष्यात अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Post Views: 58